असं कधी होतं कां जेव्हा तुम्हाला तुमचे केस ओढावेसे वाटतात, दात एकमेकांवर घासावेसे वाटत आहेत आणि मुठ घट्ट करावीशी वाटते? बरं, मग आता आपली मूठ आणखी घट्ट करा. खरं तर, संपूर्ण शरीर घट्ट करा. श्वास सोडा, तुमचे पोट आत घ्या, चेहऱ्यावर आठ्या पाडा आणि तुमचे ओठ एकत्र आणून दुमडा. आणि ‘हा’ आवाज करत सोडून द्या. तुम्हाला अजून आनंद झाला कां? मूठ बंद करून ठेवण्यात मज्जा आली की सोडून मोकळा होण्यात तुम्हाला मजा आली?
वरील अनेक सुक्ष्म योग तंत्रांपैकी एक आहे. या योग विश्रांती तंत्रांची वेगळी गुणवत्ता म्हणजे ती साधी, लहान आणि सूक्ष्म आहेत. आणि जेव्हा तुम्हाला तुमचे केस ओढावेसे वाटत नाहीत (जेंव्हा तुम्ही वैतागलेले नसता) तेव्हा सुद्धा तुम्ही ते करू शकता. पल्लवी जोशी, सुक्ष्म योगाच्या नियमित अभ्यासक म्हणतात, “स्वत:ला आराम देण्याचा हा एक जलद मार्ग आहे.” आणखी एक सूक्ष्म व्यायाम प्रेमी म्हणतात, “तुम्ही हे कधीही आणि कुठेही करू शकता – घरी बसून, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कार, बसमध्ये किंवा विमानात प्रवास करताना”.
सुक्ष्म योग व्यायामासाठी सूचना
सुक्ष्म योगास वेळ किंवा तयारी लागत नाही. हे छोटे व्यायाम सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या उघडतात आणि ७ मिनिटांपेक्षा कमी वेळात, तुम्हाला खूप स्पष्ट फरक जाणवू शकतो.
- काही चूक झाली की आपण डोक्यावर हात ठेवून म्हणतो, ‘अरे देवा!’ मसाज केल्याने मन शांत होते, आणि मन मोकळे झाले की जीवन नितळ होते.
- तुमचा अंगठा आणि तर्जनी वापरून तुमच्या भुवया ५-६ वेळा चिमटीमध्ये पकडा.तुम्हाला माहित आहे का की आपण चेहऱ्यावर जेव्हा आठ्या पडतात तेव्हा ७२ स्नायूंचा वापर होतो आणि हसण्यासाठी फक्त अर्धे स्नायू वापरले जातात.
- तुमचे डोळे ५-६ वेळा घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा.
- तुमचे डोळे घट्ट दाबा आणि नंतर ते पूर्ण उघडा. हे परत परत १०-१५ वेळा करा.
- तुमचे कान १०-१५ सेकंदांसाठी ओढा. शास्त्रज्ञ म्हणतात की सर्व नसा वाढतात प्रज्ञा (जागरूकता) कानाच्या खालच्या भागात स्थित आहेत.कधीकधी, पालक किंवा शिक्षक मुलांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि चूक होण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांचे कान ओढतात. कान ओढले तर कुणालाही कान ओढावे लागणार नाहीत.
- तुमचे कान धरा आणि तुमचे कान गरम होईपर्यंत त्यांना घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (सायकल चालवल्यासारखे) हलवा.
- जबड्यापासून हनुवटीपर्यंत तीन बोटे (पहिली, मधली आणि अनामिका) हलवा आणि गालांना मसाज करा. हे करताना तुम्ही तुमचे तोंड उघडे ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या जबड्यांमधील जागेत गाठी सापडल्या आहेत कां ? ही एक अशी जागा आहे जिथे तणाव लपविला जातो. तुम्ही किती ‘खट्याळ’ आहात ते पहा आणि सर्व गाठी काढा.
- तुमचा जबडा ८-१० वेळा उघडा आणि बंद करा.
- तुमचे तोंड उघडा आणि तुमचा जबडा ८-१० वेळा बाजूला हलवा.
- आपली मान फिरवा. श्वास घेताना आपले डोके मागे घ्या आणि श्वास सोडा, आपल्या हनुवटीचा छातीला स्पर्श करा. आपले डोके घड्याळाच्या दिशेने फिरवा. तुमची मान वर जाताना (वर्तुळाचा पहिला अर्धा) श्वास घ्या आणि सुरुवातीच्या स्थितीत (वर्तुळाचा दुसरा अर्धा) परत खाली येताना श्वास सोडा. हे ५-६ वेळा घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने करा.
- २ मिनिटे आपले हात हलवा. तुम्हाला किती तीव्रतेने हलवायचे आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर कुत्रे आणि मांजरी त्यांच्या अंगावर पाणी राहू देऊ इच्छित नसताना ते कसे थरथरतात ते आठवा. ते फक्त जोऱ्यात झटकतात आणि पुढे जातात. म्हणून झटका, झटका आणि झटका आपले हात झटका आणि हळू हळू त्यांना थांबवा आणि शांत बसा.
तुम्ही या तंत्रांचा सराव करत असताना, प्रत्येक ताणाचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला समजू लागते. प्रत्येक लहान हालचाल किंवा क्रियाकलाप काही ताण सोडतो आणि आपण हळूहळू आपल्यातील प्राण (ऊर्जा) हालचालीची यंत्रणा समजून घेणे सुरू करू शकता/अनुभव घेता. हे ज्ञान केवळ अभ्यासाने आणि अनुभवाने मिळू शकते, वाचनाने नाही. तुम्ही स्वतःला अशा आयामामध्ये पहाल जिथे तुमचे शरीर-मन समन्वय सहज आणि अचूक आहे. तरीही तो योगाचा केवळ एक परिधीय दुष्परिणाम आहे.
अजून बरेच काही आहे. आनंदाने सराव करा!