तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर तुमची शरीर प्रकृती त्या दिवसभरासाठी आपली एक लय स्थापित करत असते. शरीरातील कोणत्याही आजारामुळे तुमचा उत्साह कमी होतो आणि दैनंदिन कामे करण्यात अडथळा येतो. अनेक योगासने तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करु शकतात, परंतु सर्वांगीण आरोग्यासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही. तुमचे मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी तुमचा मेंदू अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रतिसाद देण्याची, समजून घेण्याची, आकलन करण्याची आणि उत्तम रीतीने कार्य करण्याची तुमची क्षमता तुमच्या मेंदूच्या आरोग्याशी संबंधित आहे.

आपल्यापैकी बहुतेकांना हे समजत नाही की, शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच, मेंदूला दररोज पोषण आणि ऊर्जेची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे व्यायामामुळे शरीराची स्थिती चांगली राहते, त्याचप्रमाणे मेंदूचे व्यायाम बुद्धीच्या भांडाराला निरोगी ठेवतात. मानवी शरीराचे कार्य चांगले चालावे यासाठी, योगासनांचा विशेषकरुन उपयोग होतो.

कार्यक्षम मेंदूसाठी योगासने आणि प्राणायाम

योग हे एक शास्त्र आहे जे शरीराची शक्ती आणि कार्यप्रणाली सुधारण्यासाठी त्याच्या जन्मजात क्षमतेचा उपयोग करते. हे शास्त्र त्वरित आकलनात्मक वाढीसाठी कार्य करु शकते. हे तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मेंदूचे कार्य अधिक जोमाने होऊ लागते. तसेच, डाव्या नाकपुडीतून श्वास घेतल्याने उजवा मेंदू सक्रिय होतो आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घेतल्याने डावा मेंदू सक्रिय होतो. ‘सुपर ब्रेन योग’ ही साध्या योगासनांची मालिका आहे, जी व्यावसायिक लोकांत आणि शिक्षकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

मेंदू अधिक कार्यक्षम होण्यासाठी येथे काही प्राणायाम आणि योगासने सुचवत आहोत:

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायामाचे फायदे.

  • राग, चलबिचल, निराशा आणि चिंता यासारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्ती.
  • एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
  • आत्मविश्वास निर्माण होतो.

पश्चिमोत्तानासन

Paschimottanasana inline
  • पाठीच्या कण्याला ताण मिळून मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
  • चिडचिडेपणा आणि क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना काढून टाकून मन शांत करते.
    पश्चिमोत्तानासना बद्दल अधिक वाचा.

सेतू बंधासन

Setu Bandhasana - inline
  • मान आणि पाठीच्या कण्याला मजबूती आणि ताण मिळतो.
  • ताणलेल्या स्नायूंना आराम लाभतो.
  • मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते.
  • मेंदू आणि मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत लाभते, ज्यामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते.
    सेतू बंधासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

सर्वांगासन

Sarvangasana - inline

सर्वांगासनाचे फायदे.

  • थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथींच्या कार्याचे नियमन करते आणि त्यांचे कार्य सुरळीत करते.
  • पाइनल आणि हायपोथेलामस ग्रंथींमध्ये अधिक रक्त पोहोचल्यामुळे मेंदूचे पोषण होते.
  • सर्व आकलनात्मक कार्ये सुधारण्यास मदत करते.

हलासन

halasana - inline

हलासन कसे करावे ते शिका.

  • मेंदूला जाणारा रक्त प्रवाह सुधारण्यास आणि मज्जासंस्थेला विश्राम मिळण्यास मदत करते.
  • पाठ आणि मानेला ताण देऊन ताणतणाव आणि थकवा कमी करते.

सुपर ब्रेन योग (उठाबशा काढणे ) कसा करावा

  • आपले हात आपल्या बाजूला ठेवून ताठ आणि सरळ उभे रहा.
  • तुमचा डावा हात उचला आणि तुमच्या उजव्या कानाची पाळी अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत धरा. तुमचा अंगठा समोरच्या दिशेला असावा.
  • तुमचा उजवा हात उचला आणि तुमच्या डाव्या कानाची पाळी धरा. तुमचा उजवा हात तुमच्या डाव्या हातावर असावा.
  • खोलवर श्वास घ्या आणि हळू हळू खाली येत दंड बैठकी प्रमाणे गुडघ्यात वाकून बसा.
  • २-३ सेकंद या स्थितीत रहा.
  • हळुवारपणे श्वास सोडत तुम्ही पुन्हा उठून उभे रहा. हे एक चक्र पूर्ण होते.
  • अशाप्रकारे आपण दररोज सुमारे १५ उठाबशा काढू शकता.

सुपर ब्रेन योगाचे फायदे

सुपर ब्रेन योग कानाच्या पाळीवरचा ॲक्युपंक्चर पॉइंट सक्रिय करतो त्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर (धूसर पदार्थ) उत्तेजित होते. हा व्यायाम तुमच्या मेंदूला खालील प्रमाणे मदत करतो :

  • मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजू चे कार्य एका लयीत जुळून येते.
  • ऊर्जा वितरित होते व शांतता मिळते.
  • विचार क्षमता उत्तेजित करतो.
  • मानसिक ऊर्जा वाढवतो.
  • तुम्हाला अधिक सर्जनशील बनवतो.
  • आकलनात्मक शक्ती विकसित करतो.
  • आपण केंद्रित होतो,एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
  • निर्णय घेण्याचे कौशल्य वाढते.
  • तणाव किंवा वर्तणुकीशी संबंधित समस्या दूर होतात.
  • तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक संतुलित बनवतो.

मेंदूचा व्यायाम स्मृतिभ्रंश, सौम्य नैराश्य, अतिचंचलता म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD), गुणसूत्रातील वाढीमुळे शरीर व मनाची वाढ नीट न होणे (डाउन सिंड्रोम), आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम) आणि व्यवस्थित वाचन करण्यास अडचण (डिस्लेक्सिया) असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही या व्यायामानंतर मार्गदर्शित ध्यान देखील करु शकता.

ध्यानाने मेंदूची शक्ती वाढवा

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील हार्वर्ड-संलग्न संशोधकांच्या टीमच्या नेतृत्वाखालील २०११ च्या अभ्यासानुसार, आठ आठवड्यांच्या ध्यान कार्यक्रमात भाग घेतल्याने स्मरणशक्ती, स्वत्वाची भावना, दुसऱ्यांबद्दल जाणीव आणि ताणतणाव यांच्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांमध्ये दखल घेण्याजोगे बदल होतात.

ध्यान हे मोठ्या मेंदूचा बाहेरील जाड थर ( सेरेब्रल कॉर्टेक्स ) आणि धूसर पदार्थाशी (ग्रे मॅटर) संलग्न आहे. मेंदूच्या या भागांचा संबंध स्मरणशक्ती, लक्ष देण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि शिकण्याची कुवत यांच्याशी असतो. त्यामुळे ध्यान हे मेंदूची शक्ती वाढवण्याचे साधन आहे.

तर, योगासने, सुपर ब्रेन योग, प्राणायाम आणि ध्यान हे सर्व तुमच्या मेंदूला चालना देऊ शकतात. यासाठी दररोज थोडा वेळ द्या आणि अधिक हुशारीने जीवन जगा!

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *