मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह हा एक विविध कारणांमुळे होऊ शकणारा विकार आहे, जो मूलत: योग्य व्यायामाचा अभाव, अयोग्य खाण्याच्या सवयी इत्यादींमुळे उद्भवतो. आधुनिक काळातील केवळ ‘तणाव’ आव्हाने आणखी कठीण करतो. हे सर्व प्रश्न ‘जीवनशैली’ मुळे निर्माण झालेले असतात. आरोग्य सेवा घेण्याव्यतिरिक्त, जीवनशैलीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. आपण जगत असलेल्या धावपळीच्या जीवनामुळे, ‘जीवनशैली’ ला महत्व देणे हे एक आव्हान असू शकते. या संदर्भात, प्राणायाम, योग आणि ध्यान, ज्याला ‘योगिक पद्धती’ म्हणतात, यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणे हे योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. याचा अर्थ त्यानंतर दैनंदिन चालण्याच्या व्यायामात सूट आहे असा नाही. रोजच्या चालण्याच्या व्यायामाशिवाय योग सुद्धा करुया आणि मधुमेहावर मात करुया.
योगिक पद्धतींच्या सहाय्याने उत्कृष्ट परिणामांसाठी नियमितपणा आणि सातत्य वाढवा. जेवढे शक्य आहे तेवढे रोजचे ठराविक वेळापत्रक काटेकोरपणे पाळा. तुमच्या इतर दैनंदिन जबाबदाऱ्यांनुसार ते वेळापत्रक सकाळचे किंवा संध्याकाळचे असू शकते. वेळ काढा आणि त्याबद्दल शिस्तबद्ध रहा. परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!
मधुमेह दोन प्रकारचा असतो – प्रकार १, यामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही आणि टाइप २, जेथे स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दुर्लक्ष होणे देखील शक्य आहे, विशेषत: जेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
मधुमेहासाठी विशिष्ट योगासने:
- कपाल भाती
- सुप्त मत्स्येंद्रासन
- धनुरासन
- पश्चिमोत्तानासन
- अर्धमत्स्येंद्रासन
- शवासन
१. कपालभाती प्राणायाम

कपालभाती कशी करायची ते शिका.
हे कपाळाला चमक देणारे श्वास तंत्र आहे. यामुळे मज्जासंस्थेला ऊर्जा मिळण्यास आणि मेंदूच्या पेशींना पुनरुज्जीवित होण्यास मदत होते. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे खूप उपयुक्त आहे, कारण ते पोटाच्या अवयवांना उत्तेजित करते. या प्राणायामामुळे रक्ताभिसरणही सुधारते आणि मनाची उन्नती होते.
२. सुप्त मत्स्येंद्रासन
सुप्त मत्स्येंद्रासनामुळे अंतर्गत अवयवांना मालिश होते आणि पचन सुधारते. हे आसन पोटातील अवयवांवर देखील दबाव आणते आणि म्हणूनच मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
३. धनुरासन

धनुरासनाचे फायदे.
धनुरासन स्वादुपिंडाचे चांगले नियमन करते आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी या आसनाची जोरदार शिफारस केली जाते. हे योगासन पोटाच्या स्नायूंना बळकट करते आणि ताण आणि थकवा दूर करण्यासाठी खूप चांगले आहे.
४. पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन याबद्दल आणखी वाचा.
पश्चिमोत्तानासन ओटीपोटाच्या आणि कटी भागातील अवयवांना मसाज देते आणि त्यामुळे त्यांचे कार्य लयबद्ध होते. यामुळे मधुमेही लोकांना याचा चांगला फायदा होतो. हे योगासन शरीरातील प्राण संतुलित करण्यास मदत करते आणि मन देखील शांत करते.
५. अर्धमत्सेंद्रासन

अर्ध मत्स्येंद्रासन शिका.
अर्धमत्सेंद्रासन पोटाच्या अवयवांना मालिश करते, फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा वाढवते आणि मणक्याला लवचिक बनवते. हे मन शांत करण्यास आणि मणक्यामधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.
६. शवासन

शवासनाचे फायदे वाचा.
सर्वात शेवटी करायचे, विश्रांतीचे योगासन, शवासन, शरीराला एका सखोल ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जाते, शरीराला आराम देते आणि तरतरीत बनवते.
मधुमेहासाठी योगाचे फायदे
जर त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतले आणि सराव चालू ठेवला, तर प्रत्येकाला योगाचा फायदा होतो. योगाच्या नियमित सरावाने शरीराला खालील प्रकारचे फायदे होतात :
- पचन, रक्ताभिसरण आणि प्रतिकारशक्ती सुधारते.
- योगामुळे मज्जासंस्थेच्या (न्यूरोलॉजिकल) आणि अंतःस्रावी (एंडोक्राइन) अवयवांच्या कार्याची गुणवत्ता सुधारते.
- दीर्घकालीन आजारांपासून बचाव होतो आणि आराम मिळतो.
- एकंदरीत शरीर निरोगी राहते, अधिक उत्साही वाटते.
श्री श्री योग आसनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तसेच श्वासोच्छवासाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देतो. त्यामुळे वैयक्तिक सराव करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. वर सांगितलेली आसने आणि प्राणायाम मधुमेहासाठी गुणकारी आहेत. आचरणात आणण्यापूर्वी योग्य मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले पाहिजे.