महिला सक्षम, चतुरस्त्र आणि यशस्वी आहेत – कामावर जोशपूर्ण आणि घरी सर्वांसाठी प्रेमळ ! जीवनाच्या विविध अंगांना एकत्र जोडून ठेवणाऱ्या आहेत. स्त्रियांना आपल्या हृदयात आणि समाजात मोलाचे स्थान आहे त्यासाठी त्यांचा कितीही आदरातिथ्य केले तर ते कमीच पडेल. मात्र देखील खूपच ओढाताण होत असते आणि त्या तणावग्रस्त असतात. ते त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाची काळजी घेत असतात, परंतु त्यांची काळजी कोण घेते? उत्तर आहे – योग. आजच्या ‘बुद्धिमान सौंदर्यवती’ साठी आवश्यक असलेले संतुलन!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आयुष्याची नायिका व्हा, पीडिता नाही.” – नोरा एफ्रॉन

महिलांना एकाच वेळेस अनेक मागण्यांना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी अनेक तज्ञांनी योगाची शिफारस केली आहे. महिलांनी मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केले तर त्यात नेहमीच अडचणी असतात. त्यांनी सुपरमॅन असण्याची अपेक्षा ठेवली जाते – दिवसा सामान्य ऑफिस स्टाफ आणि रात्री सुपरहिरो, एकाच वेळेस कायम अनेक कामे करणे अपेक्षित असते. महिलांनी केवळ त्यांची घरगुती कर्तव्ये कार्यक्षमतेने आणि दिमाखात सांभाळली तर पाहिजेतच, शिवाय पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या शिक्षण आणि बौद्धिक क्षमतेचे समर्थन करत चार भिंतींच्या बाहेरही काम केले पाहिजे.

जगभरातील महिलांना एकाच वेळी अनेक चेंडू हवेत वर राखण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यापैकी एकही चेंडू कधीही पडणार नाही. यामुळे महिलांसाठी योगाभ्यास वरदान ठरेल. योग हे त्यांच्या कठीण आणि जाचक जगात विवेक आणि शांतता प्राप्त करण्याचे एक साधन आहे. सुलभ प्राणायाम यामुळे महिलांना शांत होण्यास आणि त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या प्रवीणतेने आणि शांततेने हाताळण्यास मदत होईल.

योग स्त्रियांसाठी त्यांचे शरीर लवचिक बनवण्यापेक्षा बरेच काही करते. हे मनाला संतुलन आणि आत्म्याला पोषण देते. म्हणूनच स्त्रियांनी त्यांच्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये योग करणे हे दुसरे काम म्हणून न मानता एक आवश्यक उपक्रम म्हणून विचार केला पाहिजे जो त्यांना त्यांच्या इतर जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करेल. योगाच्या संदर्भात तो केंव्हा सुरू करायचा असा जो तार्किक प्रश्न उद्भवतो. महिलांच्या बाबतीत हे अत्यंत सुलभ आहे कारण योग सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. स्त्रिया योगाचे असंख्य फायदे कसे मिळवू शकतात हे पाहूया.

योग – जीवनाच्या सुरुवातीच्या काळात महिलांसाठी आशीर्वाद

“श्री श्री योग प्रशिक्षकाच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली, मी साधेपणाने आसने आणि मुद्रा शिकू शकले आणि त्यांचे महत्त्व देखील समजू शकले. हा कोर्स मन आणि शरीराच्या मिलनाचा अनोखा उत्साहवर्धक अनुभव आहे.”

अनामिका खोसला, एचआर, प्रशासन आणि वित्त प्रमुख, केमास प्रा. लि., भारत.

पौगंडावस्थेतील महिलांसाठी योगाची फार शिफारस केली जाते. हा गोंधळाचा काळ तरुण मुलींच्या संपूर्ण आयुष्याला आकार देणारा असतो कारण त्यांच्या शरीरात आणि मनात मोठे बदल होत असतात. या टप्प्यावर महिलांसाठी विविध योगासने या अनेक बदलांशी सहज आणि वेदनारहितपणे जुळवून घेण्याची खात्री करण्यासाठी बनवली गेलेली आहेत. उदाहरणार्थ, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव अस्वस्थ, भयभीत आणि गोंधळलेल्या किशोरवयीन मनाला शांत करण्यास मदत करतो. भरकटलेले आणि डगमगणारे मन हे किशोरवयीन शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांचा परिणाम आहे. धनुरासन आणि वज्रासन यांसारखी आसने ही त्या योगासनांपैकी आहेत जी महिलांना नियमित आणि निरोगी मासिक पाळी विकसित करण्यास मदत करतात. या आसनांचा नियमित सराव केल्याने महिलांच्या स्नायूंची ताकद वाढते, लठ्ठपणा टाळता येतो आणि हार्मोन्स संतुलित ठेवून निरोगी पुनरुत्पादक अवयव विकसित होतात.

योग – महिलांच्या उत्पादनक्षम वयाच्या चरमसीमेतील कालावधीसाठी योग्य

गर्भधारणा आणि मातृत्वाच्या काळात महिलांमध्ये विविध शारीरिक बदल होतात. योग महिलांसाठी उत्पादकता सुधारण्यास मदत करतो. महिलांना त्यांच्या गरोदरपणात विविध ‘उपरेपणाची’ भावना येते. अशा वेळेस चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करणे आणि राखणे महत्वाचे आहे. अनेकवेळा त्यांच्या नियंत्रणात नसलेले हार्मोनल बदल पाहता हे काम अवघड जाते. महिलांना शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सर्वोच्च स्थितीत ठेवण्यासाठी तज्ञांनी काही योगासनांची शिफारस केली आहे. योगा महिलांना लवचिक आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी सक्षम ठेवते. योग सुनिश्चित करते की महिला गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीदरम्यान उद्भवू शकणार्‍या कोणत्याही गुंतागुंतीवर मात करण्याची स्वतःला इष्टतम संधी देऊ शकतील.

गर्भवती महिलांनी प्रसूतीपूर्व योग केल्यास त्यांना त्याचे अनेक फायदे मिळतात. प्रसूतीपूर्व योग शरीराच्या बदलत्या गरजा आणि क्षमतांनुसार तयार केला जातो. हा स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यास आणि मणक्याला आधार देण्यास मदत करते, ज्यामुळे पाठीला अतिरिक्त दबावाचा सामना करण्यास मदत होते. प्रसूतीनंतरचा योग प्राणायाम आणि योगिक श्वासोच्छवासाच्या स्वरूपात स्त्रियांना प्रसूतीनंतर लवकर बरे होण्यास, त्यांच्या स्नायूंच्या तंतूंमध्ये दृढता आणण्यास आणि स्तनपान वाढवण्यास मदत करते.

संक्रमण काळात योग

हे वय स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सर्वात कठीण वय आहे परंतु स्त्रियांसाठी या वयातील गुंतागुंत फारच त्रासदायक आहे. स्त्रियांना रजोनिवृत्ती, वजन वाढणे, थायरॉईड समस्या आणि अशा इतर परिस्थिती आणि आजारांचा सामना करावा लागतो. या काळात महिलांना योगाचे फायदे भरपूर आहेत. योगामध्ये उत्तम उपचार शक्ती आहेत आणि योग संप्रेरकांचे संतुलन राखण्यास, वजन नियंत्रित ठेवण्यास, रजोनिवृत्ती सुरळीतपणे पार पडण्यास आणि निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करू शकतो. प्राणायाम आणि ध्यान महिलांना त्यांच्या जीवनातील या कठीण आणि गोंधळाच्या काळात खूप मदत करते.

श्री श्री योग – महिलांचा आयुष्यभराचा साथीदार

श्री श्री योगामध्ये महिलांच्या जीवनातील या टप्प्यांसाठी महत्त्वाचे घटक आहेत. पौगंडावस्थेपासून ते मातृत्व, रजोनिवृत्ती आणि वृद्धापकाळापर्यंत स्त्रियांच्या जीवनात अनेक बदल होत असतात. योगामुळे महिलांना त्यांच्या जीवनात असंतोष आणि असंतुलन निर्माण करणाऱ्या बदलत्या मूडपासून आराम मिळेल. महिलांसाठी त्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार दैनंदिन दिनचर्या बनवली जाऊ शकते. योगामधील आसने स्त्रियांसाठी अशा प्रकारे तयार केली जाऊ शकतात की जी त्यांना समाधानी ठेवतात. त्यामुळे त्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती मिळवू शकतात.

श्री श्री योग अभ्यासक्रम विविध योग दिनचर्या शिकवतो, ज्याचा सराव – आपल्या घरी तसेच आपण कामाच्या ठिकाणीही – कोठेही केला जाऊ शकतो. योगासन, प्राणायाम आणि ध्यान तंत्र हे सर्व श्री श्री योग कोर्समध्ये शिकविले जाते जे स्त्रीला तिच्या जीवनातील विविध, आव्हानात्मक टप्प्यात मदत करू शकतात.

महिलांची सुवर्ण वर्षे आणखी तेजस्वी बनवण्यासाठी योग

 “श्री श्री योगाच्या नियमित सरावाने मला शरीर, मन आणि आत्मा यासाठी स्पष्ट आणि अनपेक्षित असे दोन्ही फायदे दिले आहेत. त्याने मला माझ्या शरीरात समाधान, सुसंवाद, आनंद, स्वीकृती आणि सहजता दिली आहे. माझ्या वेगवान जीवनातील नवीन क्षितिजे शोधून काढताना मला माझ्यातील सामर्थ्य आणि कमकुवतपणाची जाणीव करून देऊन अत्यंत आव्हानात्मक काळात माझ्या आंतरिक तेज आणि सामर्थ्याशी जोडलेले राहण्यात मला मदत झाली आहे”, अनामिका यांनी सांगितले.

महिलांच्या जीवनातील सुवर्ण वर्षे महिलांसाठी आणखी अनोखी आव्हाने घेऊन येतात. या टप्प्यात महिलांसाठी योग त्यांच्या कमी झालेल्या शारीरिक हालचालींना सहाय्य करतो आणि म्हणून सहज सुलभ आसनांचा समावेश केलेला असतो. या आसनांचा उद्देश रक्ताभिसरण सुधारणे आहे. एक निरोगी मज्जासंस्था शरीराला ताणण्यास आणि अखेरीस पूर्णपणे आराम करण्यास मदत करेल. सर्व टप्प्यांप्रमाणे या टप्प्यावर योग शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही घडवून आणण्यासाठी आहे, ज्यामुळे संतुलन आणि सुसंवाद वाढतो.

रहस्य म्हणजे जसे श्वास घेतात तसेच योगालासुद्धा स्वतःच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे . नियमितपणे सतत केल्याने योगाभ्यास कोणत्याही वयातील महिलांसाठी उत्कृष्ठ ठरेल.

श्री श्री योग हा स्त्रियांसाठी एक सुखावह अनुभव आहे आणि त्यासोबत एकंदरीत सर्वांगीण आरोग्याची भावना आहे. आपली श्री श्री योग दिनचर्या हा फक्त आपल्यासाठी राखून ठेवलेला वेळ आहे. करिअर स्त्री, पत्नी आणि आई होण्याच्या मागण्यांपासून ब्रेक घ्या आणि स्वाभाविक राहा!

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *