गुरुदेव श्री श्री रवि शंकर

चरित्र

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे एक मानवतावादी नेते, अध्यात्मिक गुरु आणि शांतीचे दूत आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंगने विविध सेवा प्रकल्प आणि कार्यक्रमांद्वारे तणाव आणि हिंसा मुक्त समाज निर्मितीच्या विचारांनी प्रेरित जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणले आहे.

सुरुवात

१९५६ मध्ये दक्षिण भारतात जन्मलेले गुरुदेव श्री श्री रविशंकर हे एक हुशार मूल होते. वयाच्या चार वर्षांपर्यंत, ते प्राचीन संस्कृत ग्रंथ, भगवद्गीतेचे काही भाग पाठ करू शकले आणि अनेकदा ते ध्यान करताना दिसत. गुरुदेवांचे पहिले शिक्षक सुधाकर चतुर्वेदी यांचा महात्मा गांधींशी दीर्घकाळ संबंध होता. १९७३ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी, गुरुदेवांनी वैदिक साहित्य आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांत पदवी प्राप्त केली होती.

 

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूजची स्थापना

गुरुदेव यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही आंतरराष्ट्रीय, ना-नफा, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून स्थापन केली. त्याचे शैक्षणिक आणि स्वयं-विकास कार्यक्रम तणाव दूर करण्यासाठी आणि कल्याणाची भावना वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि कोर्सेस शिकवतात. केवळ एका विशिष्ट लोक समूहासाठी नव्हे तर जागतिक पातळीवर आणि समाजाच्या सर्व स्तरांवर हे कार्यक्रम आणि कोर्सेस प्रभावी ठरत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रम सध्या १५६ देशांमध्ये सुरु असतात. १९९७ मध्ये, गुरुदेवांनी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (IAHV) ची सह-स्थापना केली, जी आर्ट ऑफ लिव्हिंगची एक भगिनी संस्था आहे. IAHV शाश्वत विकास प्रकल्पांचे समन्वय साधते, मानवी मूल्यांचे पालनपोषण करते आणि संघर्ष निराकरण सुरू करते.

 

प्रेरणादायी सेवा आणि जागतिकीकरण

एक प्रख्यात मानवतावादी नेता, गुरुदेव यांच्या कार्यक्रमांनी विविध पार्श्वभूमीतील लोकांना मदत केली आहे – नैसर्गिक आपत्तींचे बळी, दहशतवादी हल्ले आणि युद्धातून वाचलेले, उपेक्षित लोकसंख्येतील मुले आणि संघर्षात असलेले समुदाय, इतरांसह. त्यांच्या संदेशाच्या सामर्थ्याने मोठ्या संख्येने स्वयंसेवकांच्या माध्यमातून अध्यात्मावर आधारित सेवेच्या लाटेला प्रेरणा दिली आहे, जे या प्रकल्पांना जगभरात प्रभावीपणे लोककल्याणाची कार्ये करत आहेत.

एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून, गुरुदेवांनी योग आणि ध्यानाच्या परंपरा पुन्हा जागृत केल्या आहेत आणि त्यांना २१ व्या शतकाशी सुसंगत स्वरूपात देऊ केले आहे. प्राचीन ज्ञानाचे पुनरुज्जीवन करण्यापलीकडे, गुरुदेवांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी नवीन तंत्रे तयार केली आहेत. यामध्ये सुदर्शन क्रिया समाविष्ट आहे ज्याने लाखो लोकांना तणावातून मुक्त होण्यास आणि दैनंदिन जीवनात उर्जेचे आंतरिक साठे आणि आंतरिक शांतता शोधण्यात मदत केली आहे.

गुरुदेवांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्या

गुरुदेवांच्या कार्याबद्दल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक जाणून घ्या

शांततेचे प्रतिक

शांततेचे दूत म्हणून, गुरुदेवांनी जगभरातील संघर्ष निराकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे कारण ते जगभरातील सार्वजनिक मंच आणि संमेलनांमध्ये अहिंसेची त्यांची दृष्टी सामायिक करतात. शांततेचा पुरस्कर्ता असलेली तटस्थ व्यक्ती म्हणून ओळखले जाते. कोलंबिया, इराक, आयव्हरी कोस्ट, काश्मीर आणि बिहारमध्ये विरोधी पक्षांना वाटाघाटीसाठी एकत्र आणण्याचे विशेष श्रेय त्यांना मिळाले आहे. आपल्या पुढाकारातून आणि भाषणांद्वारे, गुरुदेवांनी मानवी मूल्यांना बळकटी देणे आणि आपण सर्व एका जागतिक कुटुंबाचे सदस्य आहोत हे पटवून देण्यावर भर दिला आहे. आंतरधर्मीय एकोपा वाढवणे आणि धर्मांधतेवर उपाय म्हणून बहु-सांस्कृतिक शिक्षणाचे आवाहन आणि शाश्वत शांतता प्राप्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.

गुरुदेवांनी मानवी मूल्ये आणि सेवेच्या पुनर्जागरणाद्वारे जगभरातील लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. वंश, राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन गुरुदेवांनी तणाव आणि हिंसाचारापासून मुक्त असलेल्या एका जागतिक कुटुंबाचा संदेश पुन्हा जागृत केला आहे.

गुरुदेवांशी संपर्क साधा