कुष्ठरोग्यांसाठी संजीवक स्पर्श (Volunteer stories in Marathi)

रुग्णांना खाद्य पदार्थांचे वितरण
संजीवनी वरकडे ०९८२२१८४७९१

अमरावती, महाराष्ट्र : सामान्यपणे कुष्ठरोग्यांना आपण कमी लेखतो आणि कोणीही त्यांच्या जवळ जाऊ इच्छित नाही. चर्चने त्यांच्या कुष्ठरोग्यांवरील खर्चाची रक्कम ४०% कमी केल्याने, अलमोरा मधील कुष्ठरोग्यांच्या हॉस्पीटलचे व्यवस्थापन आणि सेवक वर्ग मोठ्या अडचणीत आला. या वर्षी १५ जून ला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ३५ स्वयंसेवकांनी हॉस्पिटलला भेट देईपर्यंत हॉस्पिटलचे व्यवस्थापक चिंतेतच होते. स्वयंसेवकांनी कुष्ठरोग्यांसाठी मोफत ध्यान शिबीर आणि भजने गाऊन सत्संग देखील केला.

‘स्वयंसेवकानी रुग्णांना कपडे आणि खाद्यपदार्थ वितरीत केले आणि हॉस्पिटलला देणगीसाठी काही रक्कम देखील जमा केली,’ असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक राजेंद्र बिश्त यांनी सांगितले. जे या सेवा प्रकल्पाच्या संयोजकांपैकी एक होते. कोणीतरी आपल्याला काहीतरी घेऊन आले हे पाहून सर्व रुग्ण आनंदी झाले, काही रुग्णांना तर आनंदाश्रू रोखता आले नाहीत. “कोणीही त्यांना भेटण्यासाठी येत नाहीत. त्यांना सर्वजण टाळतात. कुष्ठरोग हा भूतकाळातील वाईट कर्मामुळे होतो, या गैरसमजापोटी त्याना सर्वजण टाळतात.” स्वयंसेवकानी जेंव्हा त्यांना मिठी मारली तेंव्हा त्यांना आनंदाश्रू आले.

२५ वर्षापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये काम करणारे श्री आनंद सिंह म्हणाले की, “लोकांमध्ये कुष्ठरोग्यांबाबतीत गैरसमज आहेत. निव्वळ स्पर्शामुळे हा रोग पसरत नाही.”

ही अलमोरा येथील दि आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवकांची दुसरी भेट होती. यापूर्वी ते १३ मे रोजी आले होते. आणखी एक स्वयंसेवक कमल कपूर म्हणाले की, ते येथे सतत भेट देत रहातील आणि रुग्णांना सर्वतोपरी मदत करत रहातील. यांच्या सोबत ही भेट घडवण्यामध्ये संतोष पंत, रमन बोहरा आणि लुसी जगुमा यांनी मदत केली.