सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ह्या दिवाळीत मनामनात ज्ञानाची ज्योत तेवत ठेऊ या, तसेच घराघरात प्रेमाची, समाजात स्नेह व समतेची ज्योत पेटवू या. वर्षानुवर्षे आपण फटाके ह्यासाठीचं फोडतो की, कुणाबद्दल आपल्या मनात(अनेक वर्षांचा वा गेल्या वर्षभरातला) राग, द्वेष असेल तो ह्या फटाक्याच्या स्फोटाच्या माध्यमातून निथळून जावा. हाच उद्देश असतो फटाके फोडण्याचा. थोडे फार फटाके फोडा, असे नाही की फटाक्यांविना दिवाळी साजरी करा. मुलांचे त्या शिवाय तर समाधानचं होणार नाही. हा मात्र त्यामुळे प्रदूषण एकदम वाढू नये. माझी विनंती आहे की, खूप जास्त फटाके फोडले तरंच दिवाळी साजरी होईल असे नाही. दिवे लावा, नाममात्र थोडे फार फटाके फोडा. खूप मिठाई खाल्ली तरंच दिवाळी साजरी होते असे समजू नका. आपल्या प्रकृतीकडेही लक्ष द्या. फक्त मिठाई वाटुनचं नव्हे तर जिव्हाळ्याने, गोड बोलून अधिक गोडवा तुम्ही पसरू शकता. आपल्या स्वभावातला गोडवा, बुद्धीची तीक्ष्णता, कृत्यातील प्रामाणिकता आणि जीवनात सुख, समृद्धी वाढो ह्या शुभकामनेतून आपण सारे मिळून दिवाळी साजरी करीत असतो. आपल्या देशाचा हा सर्वात प्रमुख सण असून आपण सारे मिळून मोकळ्या मनाने हा सण आनंदात साजरा करतो. आपल्या आयुष्याला एका उत्सवाच्या रुपात बघत असतो. चला, ही काळजी घेऊ या की, प्रदूषण न वाढविता, पर्यावरण व प्रकृती बद्दल आपली सजगता वाढवित, दुसऱ्यांच्या गरजांचा विचार करू या . . .
- श्री श्री रवी शंकर