मदत : पूरग्रस्तांना ब्लँकेट आणि तंबू दिले.
मीनाक्षी चौहान : ०९४१८४८३८२२
रीसी, जम्मू-काश्मिर : श्री श्री म्हणतात, “संपन्न व्यक्तींनी गरजू तसेच कमी संपन्न व्यक्तींना मदत केली पाहिजे.”, आणि त्यांचे साधक तसेच वागतात. त्यामुळे जम्मू-काश्मिर मधील रीसी जिल्हा, ज्याला पुराचा मोठा फटका बसला होता, तेथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना तंबू, कपडे, ब्लँकेट आणि खाद्यपदार्थ पुरवता आले.
या जिल्ह्यातील सतोई, कोटली, सिरला, भागा, करयानी, चौराकोट येथे तसेच स्माख, गैंथा आणि डिंगाकोट या गावांमध्ये दोन टप्प्यांमध्ये मदत दिली गेली. स्वामी अशोकजी, ज्यांनी ही रसद ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली ते म्हणाले, “ही ठिकाणे समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असल्याने संपर्काबाहेर होती.” या प्रभावित भागामधील अंदाजे पस्तीस घरे पुरामुळे वाहून गेली होती, बाकीची खूपशी उध्वस्त झाली होती. दिल्लीतील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या ग्रुपने ही मदत पोहोचवली.
“शुक्रिया” या एका छोट्या धन्यवादी शब्दाने, आर्ट ऑफ लिव्हिंग कडून मिळालेली ही मदत अविस्मरणीय आहे, अशी भावना रहमत अली, ज्यांना ब्लँकेट आणि तंबू मिळाले, त्यांनी व्यक्त केली. सरवाना देवी आणि मुकुंदलाल यांनी या प्रलयामध्ये सर्वस्व गमावले होते. ते म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांना आता कोणीही परत आणू शकत नाहीत, आता आम्हाला त्यांच्या शिवाय हे जीवन जगायचे आहे. परंतु सरकार कडून सुद्धा काहीही मदत मिळाली नसली तरी ही मदत आम्हाला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.”
या प्रकल्पाचे समन्वयक स्वामी आशिकजींना ०९६२२०९७३४३ वर संपर्क साधू शकता.