श्री श्री रविशंकर
काळ आणि आकाश तत्व असीम,अमर्याद आहे.वाळूचे कण अनंत आहेत.या ब्रह्मांडात अगणित अणू,तारे-ग्रह आणि आकाशगंगा आहेत.तद्वत या ग्रहावरील जीवन देखील मंडलाकार असल्याने अनादी आणि अनंत आहे.वर्तुळाला ना सुरवात ना अंत ना उद्दीष्ट्य ना दिशा,सत्याला देखील ना दिशा ना उद्दिष्ट तर सत्य हेच उद्दीष्ट्य आहे जे अमर्याद आहे. या कालवश देहामध्ये अमर्यादितता अनुभवणे,या सीमित जीवनमानामध्ये अमर्याद काळाची अनुभूती घेणे, दुःखामध्ये आनंदाची अनुभूती घेण्यासाठीच तर आपण येथे आलो आहोत.
दिवाळी | Diwali
आज दिवाळी आहे,दिव्यांचा उत्सव.सर्व इमारती आणि रस्ते रंगीबेरंगी दिव्यांनी झगमगून गेली आहेत. दिवाळीचे चार पैलू आहेत:
●दिवे उजळवणे|Lighting of lamps
दिवाळीमध्ये प्रकाश पसरवणे हे ज्ञानप्रसाराचे प्रतिक आहे.
●फटाक्यांची आतषबाजी |Fire crackers
जेंव्हा बाहेर आवाजाचा धमाका होतो तेंव्हा आपले मन शांत होते.फटाके फोडण्याचे हेच रहस्य आहे.
●भेटवस्तू आणि मिठाईचे आदान प्रदान |Gift exchange and distribution of sweets
मना मनामधील कोणतीही कटुता गोडीमुळे कमी होईल आणि नाते संबंध पुन्हा दृढ होतील.
●समृद्धीबद्धल कृतज्ञता |Feeling the abundance
जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे त्याबद्धल कृतज्ञ राहण्याचा हा दिवस आहे.
● सजगता टिकवण्यासाठी | Awareness
जेंव्हा खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते तेंव्हा उत्सव साजरा करावा वाटतो आणि उत्सवामध्ये आपली सजगता गमावण्याची शक्यता असते. प्राचिन ऋषी मुनींना हे ज्ञात होते म्हणून हि सजगता टिकून राहण्यासाठी प्रत्येक उत्सव आणि समारंभांमध्ये सजगता टिकवण्यासाठी पवित्र अश्या पुजांचा समावेश केला आहे. म्हणून हि दिवाळी या ज्ञानाने साजरी करूया, आणखी समृद्ध होण्यासाठी असलेल्या समृद्धीबद्धल कृतज्ञ राहूया.ज्यांच्याकडे आहे त्यांना आणखी मिळेल.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य आपला अभिप्राय देण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : webteam.india@artofliving.org Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri