सगळेजण गोडवा शोधत आहेत, पण ज्यांना तो गोडवा सापडतो ते दुसऱ्यांना देऊन टाकतात. (Sharing sweets of WCF in Marathi)

गुरुजी व्ह्ऱ्यांडयात काही लोकांबरोबर होते. त्यांनी काशीभैय्याला कुटीरमधून मिठाई आणायला सांगितली, पण मिठाई मिळत नाही असे सांगत काशीभैय्या परत आला. तो ३ वेळा परत परत गेला आणि तरीही त्याला काही मिठाई मिळाली नाही. त्यानंतर गुरुजी स्वतः आत गेले आणि मिठाई घेऊन आले आणि सगळ्यांना दिली.

आयुष्यात सुद्धा असेच होते, बऱ्याच लोकांना आयुष्यात गोडवा हवा असतो, काही त्यासाठी खूप प्रयत्न करतात पण तो फार थोड्यांनाच मिळतो. आणि तो ज्यांना मिळतो ते तो इतरांना देऊन टाकतात.

काही लोक अत्यानंदी असतात तर काही परमानंदी.

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf