तुमचे शरीर हे निसर्ग देवतेने तुम्हाला दिलेली एक अमुल्य भेट आहे. आपल्या शरीराचा आदर ठेवा. तुमच्या शरीरात देवाला आमंत्रित करण्याची कुवत आहे. तुमचे शरीर हे एक मंदिर आहे ज्यामध्ये देव प्रवेश करतो आणि निवास करतो. म्हणूनच, शरीराला निरोगी ठेवा, त्यामध्ये रुपांतर घडवून आणा आणि त्यामध्ये केवळ एक नंदादीप तेवत ठेवा. एवढे पुरेसे आहे देवाला यायला आणि त्यामध्ये निवास करायला.
शरीर हे देवाचे सर्वात मौल्यवान निवासस्थान आहे.
तुमच्या शरीरात काय आहे? ते देवाची पवित्र वेदी आहे. हास्याची वेदी पसरवा आणि ज्ञानाचा दीप पेटवा आणि “आनंदकंद” याला आमंत्रित करा, एका बालकाचा परमानंद तुमच्या शरीरात आहे. जर नंदकुमारला तुमच्याकडे यायचे असेल तर प्रकाशाची आवश्यकता आहे, हास्याच्या वेदीची गरज आहे.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.