कोलंबिया : बंडखोर गनिमांच्या पुनर्वसनात आर्ट ऑफ लिव्हिंग मदत करणार

Colombia
2nd of डिसेंबर 2016

श्री श्रीं नी कोलंबियाच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेतली

२ डिसेंबर २०१६, बोगोटा :

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले आध्यात्मिक आणि मानवतावादी गुरु श्री श्री रविशंकर यांनी मध्य आणि दक्षिण अमेरिका या हिंसाचार आणि मादक पदार्थ यांनी जगात सर्वात जास्त ग्रासलेल्या क्षेत्रात एका विशेष अशा शांती कार्यास आरंभ केला आहे.FARC ने अहिंसेचा मार्ग स्वीकारल्यामुळे आणि कोलंबियाच्या ऐतिहासिक शांती करारानंतर यशस्वी झालेल्या या आधीच्या दौऱ्यांनतर गुरुदेव पुन्हा एकदा कोलंबिया सरकारच्या निमंत्रणावरून सलोखा व समेट घडविण्याचे कार्य पुढे नेण्यासाठी कोलंबियाला गेले आहेत.

काली येथे झालेल्या सलोख्याच्या सभेचे (MacroRueda) उद्घाटन श्री श्री रविशंकरजींच्या हस्ते झाले व राष्ट्राध्यक्ष जुआन सांतोस हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व विरोधी पक्षनेते, अलवारो उरीबी यांचीही त्यांनी भेट घेतली आणि शांती कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांचा दृष्टीकोन आणि त्यांची भूमिका याविषयी चर्चा केली. कोलंबियन एजन्सी फॉर रीइंटेग्रेशन चे संचालक जोशुआ मित्रोती; कोलंबियाच्या शांती प्रक्रियेचे मध्यस्थ, हेन्द्री अकोस्टा ह्यांनीही गुरूदेवांची विशेष भेट घेतली. या सलोखा सभेतील प्रमुख वक्ते म्हणून भाषण करताना गुरुदेव म्हणाले, की FARC च्या बंडखोरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात एकरूप करून घेणे महत्वाचे आहे. “समाजाची सूड घेण्याची भावना असते. विश्वासातील या त्रुटीला आपण भरून काढायचे आहे. त्यासाठीच आपण क्षमा याचना प्रक्रिया केली. अशी प्रक्रिया केली नाही तर सामान्य लोक या माजी बंडखोरांना वेगळी वागणूक देतील. त्यांना हे समजायला हवे की  FARC बंडखोरही बळी पडलेले आहेत.”

बंखोरांच्या बरोबर काम करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाबद्दल श्री श्री रविशंकरजी म्हणाले, “आपण त्यांना १०० ते ३०० जणांच्या लहान लहान गटांमध्ये प्रशिक्षण देऊ शकतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे त्यांना जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टीकोन मिळेल.”  FARC आणि कोलंबिया यांच्या झालेल्या पहिल्या शांती करारापासूनच आर्ट ऑफ लिव्हिंग, बळी पडलेले लोक आणि FARC यांना क्षमा याचनेसाठी समोरासमोर आणत आहे. युद्धग्रस्त देशासाठी ती एक खूपच हृद्य घटना आहे.  शासकीय अधिकारी, विरीधी पक्ष नेते, महत्वाचे हितचिंतक आणि सामान्य जनता यांच्याबरोबर झालेल्या भेटी यामुळे आव्हानात्मक अशा सलोखा प्रक्रियेला मोठे उत्तेजन मिळाले आहे.

 उत्साही जनतेने बगोता आणि काली येथे श्री श्रीं चे जंगी स्वागत केले. संसदेच्या समोरील, ऐतिहासिक बोलीवार चौकात झालेल्या सार्वजनिक सभेत सर्व स्तरातील लोक प्रचंड संख्येत उपस्थित होते. सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन रॉकबँड Aterciopelados च्या सदस्यांनी गुरुदेवांसोबत ध्यान केले व त्यांच्या सन्मानार्थ दोन भजने म्हटली. Aterciopelados या रॉक बँड ला अनेक ग्रामी पारितोषिके मिळाली आहेत तसेच  त्यांनी हिंसेच्या विरोधात केलेल्या कामगिरीसाठी संयुक्त राष्ट्रातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

श्री श्रीं चा पुढाकार : मादक पदार्थ आणि माफियांचे अधिराज्य असलेल्या प्रदेशात शांती चर्चेला प्रारंभ 

६ डिसेंबर २०१६, मेक्सिको  :

 मेक्सिको येथील भव्य सभेत भाषण केल्यानंतर श्री श्री रविशंकरजी, निकारागुआ आणि साल्व्हेडोर येथील हिंसाग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. मेक्सिको मधील हजारो कैदी आणि बाल गुन्हेगार यांच्या पुनर्वसनाचे त्याचप्रमाणे युवकांना मादक पदार्थ आणि बंदूक यांच्यापासून दूर ठेवण्याचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंग गेल्या दशकाहून अधिक काळ करीत आहे. लाखो युवक, हजारो तुरुंग अधिकारी आणि तुरुंग संचालक यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरांचा फायदा झाला आहे. या प्रकल्पांमुळे अनेक कायदेपंडितांनी आणि फौजदारी न्याय विभागातील तज्ञांनी कौतुक केले आहे. मेक्सिको येथे श्री श्री रविशंकरजी, संसदेचे नेते, जेष्ठ धार्मिक नेते, राजकारणी, व्यावसायिक तसेच मादक पदार्थांचे बडे व्यापारी आणि तुरुंगातील गुंड यांचीही भेट घेणार आहेत. 

 दक्षिण आणि मध्य अमेरिकेच्या दहा देशांच्या भेटीत, मेक्सिको, एल साल्वाडोर, इक्वाडोर, निकारागुआ, कोस्टारिका, ग्वाटेमाला, पनामा, ब्राझील आणि व्हेनेझुएला या देशाना श्री श्री रविशंकरजी भेटी देणार आहेत. कोलंबियातील दुसऱ्या क्रमांकाचा बंडखोरांचा गट, इक्वेडोर मधील ELN यांच्याशी चर्चेला सुरवात करतील. अनेक वर्षे चालू असलेली अशांती, मादक पदार्थ आणि अनेक ठिकाणी असलेले माफियांचे अधिराज्य असलेल्या या प्रदेशात,  एका भारतीयाने हिंसाचार रोखण्याच्या दृष्टीने काही कार्य हाती घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.