कोटा येथे एक लाख विद्यार्थ्यांना श्री श्री रविशंकरजींनी केले मार्गदर्शन

इंडिया

श्री श्रीनी त्यांच्या व्यावहारिक अध्यात्माने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले​.

कोटा: कोटा येथे आज श्री श्री रविशंकरजींनी एक लाख विद्यार्थ्यांना देशप्रेमाने ओत प्रोत आणि आशावादी राहण्यासाठी संदेश दिला. 

कार्यक्रमाचे वातावरण आचंबित करणारे होते. विद्यार्थ्यांच्या जोश आणि उत्साहामध्ये मानवतावादी संत आणि अध्यात्मिक नेते श्री श्रींनी कोटा मधील सात कोचिंग संस्थाना मार्गदर्शन केले. वैयक्तिक प्रश्नोत्तरानंतर प्रभावी ध्यान घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले,

या कार्यक्रमासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री मा.वसुंधरा राजे सिंधिया उपस्थित होत्या. त्यांनी पण आपले मत सुंदरपणे व्यक्त केले, ”उपस्थित सात संस्था व्यावसाईक दृष्टया स्पर्धक असले तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या एका व्यासपीठावर उपस्थित आहेत.

यावेळी गुरुदेव पुढे म्हणाले की, ”युवकाचे लक्षण आहे स्वप्न पाहणे. क्रीडा, कला, साहित्य कोणतेही क्षेत्र असो, देशासाठी काहीतरी करणे.” 

श्री श्रीनी सांगितले की, विश्वास बाळगा की त्यांच्या सोबत जे काही होईल सर्वोत्कृष्टच होईल. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व वाईट सवयींपासून दूर रहायला सांगून म्हणाले की दारू तसेच इतर व्यसनांपेक्षा अध्यात्म आणि ध्यानामध्ये अशी नशा आहे जी तुम्हाला उत्कृष्ट जीवन देऊ शकेल

गुरुदेव म्हणाले की, या जगाचे दिशादर्शक बना. हे जग तुमच्याशी एकात्म आहे आणि या जगाला तुमची गरजदेखील आहे. 

अत्यंत चैतन्यदायी वातावरणात गुरुदेवांनी विद्यार्थांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रश्नोत्तरामध्ये माता पित्यांच्या अपेक्षा, स्पर्धापरीक्षा कशा पद्धतीने द्याव्यात पासून इतरांशी आपली तुलना इत्यादी समस्यांवर विस्तृत उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि ध्यान यांच्या गरजेवर देखील प्रश्न विचारले.

श्री श्रीनी सांगितले की जीवन एक उत्सव आहे.पुढे ते म्हणाले, ”जेंव्हा तणाव निर्माण होतो आपण उदास होतो, नैराश्य येते आणि लोक याचा फायदा घेऊन दुरुपयोग करणे सुरु करतात. आणि युवकांना दगडफेक तसेच समाजविघातक कामात गुंतवतात. अध्यात्म आणि ध्यान आपल्याला या सर्वातून बाहेर काढते. 

”कोटा येथे सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या “स्प्रेडिंग स्माईल कोटा” या उपक्रमा मध्ये अंदाजे ८०००० विद्यार्थ्यांनी ध्यानाचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अति तणावग्रस्त असतात अशा विद्यार्थ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने हे कॅंपेन सुरु केले होते. खरेतर कोटा भारतातील कोचिंग संस्थांची राजधानी आहे. यासोबत ६००० विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या “सुदर्शन क्रिया” या प्रभावी श्वसन प्रक्रियेचा लाभ घेतला आहे.

या उपक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी टीमने जुलै २०१६ मध्ये सुरवात केली. या मध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यावसायिक यांनी युवकांना समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे.

या कार्यक्रमानंतर गुरुदेव जयपूरसाठी रवाना झाले जिथे ते शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रमुख व्यक्तींना भेटले. याचे आयोजन एफआयसीसीआई च्या महिला विंगने केले होते.

“स्प्रेडिंग स्माईल कोटा” उपक्रमाची वैशिष्ट्ये:

  • २० पूर्ण वेळ स्वयंसेवक आणि प्रशिक्षकांनी हे आयोजित केले.
  • ८०००० विद्यार्थ्यांनी होस्टेल आणि वर्गांमध्ये ध्यानाचा लाभ घेतला.
  • ६००० विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभावी श्वसन प्रक्रिया सुदर्शन क्रियेचा लाभ घेतला आहे.
  • देशातील सुप्रसिद्ध कोचिंग संस्था ‘रेझोनन्स’च्या ११० प्रशिक्षकांनी हैप्पीनेस कार्यक्रमाचा अनुभव घेतला आहे.
  • ६ मोठ्या संगीत कार्यक्रमामध्ये १४००० विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी भाग घेतला.
  • १५ ऑगस्ट रोजी “देश मेरे” हा शासनाद्वारे प्रायोजित देशभक्तीपर कार्यक्रम ८०० प्रशासक, उद्योजक, राजकीय नेते आणि शिक्षकांनी पाहिला.