प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीं चे “स्वच्छता ही सेवा” अभियान श्री श्री रविशंकर जी यांनी बेंगळूरू मधील आर्ट ऑफ लिविंगच्या आंतरराष्ट्रीय आश्रमातून प्रारंभ केले.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मवर्षाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरु केलेल्या “स्वच्छता ही सेवा” या अभियानाचा प्रारंभ श्री श्री रविशंकरजींनी बेंगळूरूमधील आर्ट ऑफ लिविंगच्या आंतरराष्ट्रीय आश्रमातून केला. या प्रसंगी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री श्री रविशंकरजी यांना धन्यवाद देताना म्हणाले कि, गुरुदेवांनी लाखो स्वयंसेवकांना स्वच्छ भारत मिशन साठी प्रेरित केले आहे. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपापसात संपर्क साधला. त्यानंतर गुरुदेव स्वतः कनकपुरा मार्ग येथील आर्ट ऑफ लिविंग सेंटर येथे हजारो स्वयंसेवकांसह या अभियानात सहभागी झाले.
या प्रसंगी गुरुदेव प्रधानमंत्री यांचे अभिनंदन करताना म्हणाले, “ अस्वच्छतेची दोनच कारणे असू शकतात, एक आक्रोश, राग आणि दुसरे औदासिन्याची प्रवृत्ती. या दोहोतून बाहेर पडून देशाला उच्च पातळीवर नेण्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत केला पाहिजे. लोकांच्यामध्ये तुम्ही यापूर्वीच उत्साह जागृत केला आहे.” याप्रसंगी गुरुदेव पुढे म्हणाले कि आपण आपले सर्व मतभेद विसरून देशाच्या स्वच्छतेची मोहिम प्रारंभ करायची हवी.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अजमेरचे दरगाह शरीफ देखील सामील होते. दरगाह शरीफवर वाहिलेल्या फुलांचे विघटन करण्याचा प्रकल्प उभा केल्याबद्धल त्यांनी गुरुदेवांचे आभार मानले.
आपण हे जाणतोच कि आर्ट ऑफ लिविंगने देशभरात ६२००० संडास बांधले आहेत. १००० बायो गॅस प्रकल्प आणि विविध मंदिर, दरगाह, भाजी मंडई आणि नगर पालिका येथे ११ कचरा विघटन प्रकल्प उभे केले आहेत ज्यामध्ये वर्षाला ११.५० लाख किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवकांनी ४५५०० स्वच्छता मोहिमा चालवल्या आणि ५२४६६ स्वच्छता कँप आयोजित केले.
वरील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये गुरुदेवांसह अमिताभ बच्चन, रत्न टाटा, दैनिक जागरण समूह, डिब्रूगण हून नवोदय स्कूल इत्यादी सामील होते.