जगात कुठेही आपत्ती आली तर आर्ट ऑफ लिविंग संस्था, तिच्या जगभरातील स्वयंसेवकांच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक शांती तसेच मदत सामग्रीची मदत जलदगतीने पुरवण्यासाठी सक्षम आहे.आपल्या नेटवर्क माध्यमातून,जगभरातील आपत्ती पुनर्वसन कार्यक्रमाचा एक महत्वाचा पुरवठाकर्ता म्हणून आर्ट ऑफ लिविंग संस्थेने स्वत:ची स्थापना आणि ओळख निर्माण केली आहे.
आर्ट ऑफ लिविंग संस्थेने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्यालुज (IAHV) आणि व्यक्ती विकास केंद्र इंडिया (VVKI) यासारख्या तिच्या संलग्न संस्थेसह, हिंसा आणि इतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त समाजाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.
त्सुनामी ग्रस्त भागात प्राथमिक मदत आणि पुनर्वसन कामापासून ते गुजरातच्या भूकंपातील मदतीत,आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे स्वयंसेवक स्वत:च्या सुरक्षेची चिंता न करता आपत्तीग्रस्तांच्या मानसिक, भावनिक आणि सामग्री च्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपस्थित होते.
सामग्रीचा तत्काळ पुरवठा आणि सेवा..
आर्ट ऑफ लिविंग संस्था कोणत्याही आपत्तीत आपत्कालीन सेवा आणि सामग्रीची मदत पुरवते.यात अन्न,कपडे,औषधे आणि निवारा यांचा समावेश आहे.डॉक्टर,सल्लागार आणि इतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य तज्ञ, अशा प्रकारच्या तत्काळ मदती या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहेत.
मानसिक आघातापासून तत्काळ दिलासा..
तीव्र शारीरिक आणि भावनिक आघात अनुभवून जे आपत्तीतून वाचले आहेत,अशांसाठी फक्त जीवनावश्यक साहित्य देणे पुरेसं नाही.अशा लोकांच्या जखमा बुजवणे आणि त्यांचे जीवन पूर्ववत करून देणे आवश्यक आहे.दक्षिण - पूर्व आशियाई त्सुनामीतून वाचलेल्या लोकांसाठी आर्ट ऑफ लिविंगने Trauma (मानसिक आघात) Relief (दिलासा) Programs आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अभ्यासाने हे दाखवून दिले की या कार्यक्रमामुळे, क्लेशकारक ताणापासून केवळ चार दिवसात लक्षणीय आराम मिळाला.
दीर्घकालीन पुनर्वसन..
खरी मुक्ती तेव्हाच लाभते जेव्हा आपत्तीतून वाचलेल्यांचे पूर्णपणे - शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या,व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर पुनर्वसन घडते.लोकांना त्यांच्या उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी एक स्थायी आधार देणे आवश्यक आहे.हे साध्य करण्यासाठी आमचे स्वयंसेवक गावागावात,तिथल्या स्थानिक समुदायासोबत घरे स्वच्छता,रस्ते,शाळा,व्यावसायिक प्रशिक्षण आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची सोय करून देण्याचे कार्य करतात.
पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना मदत..
जुलै 2010 मधील मुसळधार पावसामुळे आपत्तीत मदत करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग पाकिस्तान संस्था उभी राहिली.
अधिक वाचा