ग्रामीण विकास (Rural development programs in Marathi)

आर्ट ऑफ लिव्हिंगचा ग्रामीण विकास प्रकल्प प्रामुख्याने युवाचार्यांच्या मार्फत चालवला जातो. युवाचार्य हे युवा

नेतृत्व शिबीर (युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम) (YLTP) पूर्ण केलेले, त्या त्या भागातील स्थानिक युवक असतात.

यात त्यांना त्यांच्या खेड्यात आणि परिसरात त्यांच्या गरजांनुसार,स्वत: पुढाकार घेऊन सेवा प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणारे कौशल्य,प्रेरणा आणि क्षमता विकसित करून दिली जाते.

पक्का अध्यात्मिक पाया असेल तरच अढळ असा आत्म-सन्मान आणि आत्मविश्वास असू शकतो.अंतर्गत शक्ती, कौशल्य आणि नेतृत्व प्रशिक्षण या मुळे या शिबिराची परिणामकारकता आणि टिकाऊपणा यांची खात्री असते.

5H प्रोग्राम मध्ये हे पाहिले जाते की प्रत्येक ग्रामीण भागात/खेड्यात बेघरांसाठी घरे,स्वास्थ्य,आरोग्य,मानवी मूल्ये आणि विविधतेत एकता असेल.सामाजिक परिवर्तन घडवणे,जगभरातील ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील दारिद्र्य,दु:ख आणि रोग यांचे निवारण करणे,तसेच शांती आणि सलोखा निर्माण करणे, हा १९९७ मध्ये सुरु झालेल्या 5H या प्रकल्पाचा उद्देश आहे.व्यक्ती आणि समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनला तर या प्रोग्रामचे परिणाम दूरगामी आणि टिकाऊ आहेत याची खात्री पटते.

5H ने मिळवलेले यश :

  • ४०,२१२ खेड्यांमध्ये पोहोचले.
  • YLTP मध्ये १,१०,००० ग्रामीण युवकांना प्रशिक्षण दिले.
  • तणाव मुक्तीसाठी १,६५,००० विनामूल्य शिबिरे घेतली. त्याचा  ५,६८८,००० पेक्षा अधिक लोकांना लाभ झाला.
  • ४९,५०० आरोग्य शिबिरे आणि २५,९५० वैद्यकीय शिबिरे घेतली, ज्याचा फायदा २५,८२,५०० जणांना झाला.
  • १० दशलक्षांहून अधिक झाडे लावली.
  • १,८९५ घरे,११५२ बोअर वेल आणि ९०४ गोबर गॅस प्लांट बांधले.
  • ५५ गावे, आदर्श गावात विकसित केली,ज्याचा फायदा १,१५,००० जणांना झाला.
  • ६,००० जणांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण दिले.

ग्रामीण भागात वीज पुरवठा :

‘एका घरात दिवा लावा’ (लाईट अ होम) या प्रकल्पाची सुरवात ऑक्टोबर २०१२ मध्ये झाली.वीज पुरवठा उपलब्ध

नसलेल्या, भारतातील ७४ दशलक्ष ग्रामीण जनतेसाठी स्वच्छ आणि परवडेल असे दिवे उपलब्ध करून देणे हे या

प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.यांच्यापैकी बहुतांश लोक दिव्याची सोय रॉकेल आणि इतर जळाऊ इंधन वापरून

करतात,जे त्यांचे स्वत:चे आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीसाठी धोकादायक आहे.

सेंद्रीय शेती :

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे २००७ पासून सेंद्रीय शेतीची शिबिरे घेतली जातात.आतापर्यंत ३२,००० जणांनी हे शिबीर पूर्ण केले आहे.या शिबिरात सेंद्रीय शेतीची तंत्रे शिकवली जातात.रासायनिक खतांच्या वापरामुळे होणाऱ्या शेताच्या

नुकसानीची व हळू हळू घटत जाणाऱ्या शेती-उत्पन्नाची जाणीव करून दिली जाते.

आमुलाग्र बदलासाठी सुरु असलेल्या क्रांतीत भाग घ्या :

  • तुम्ही प्रेरित होऊन सामाजिक जबाबदारी घेण्यास तयार आहात कां ?
  •  
  • जो बदल अपेक्षित आहे त्यासाठी त्या कार्यात सहभाग घ्यायचा आहे कां ?
  •  
  • नव्या नेत्यांची फौज उभी करायची जबाबदारी घेणार आहे कां ?

मग परिवारात सामील व्हा :

YLTP संचालकांशी संपर्क साधा.

ट्रान्सफॉर्म लाईव्हज.

गिफ्ट अ स्माईल.

नैरोबीतील मुलांसाठी हँडस् अप

मुलांचे मन आणि भावना सांभाळण्याची तंत्रे शिकवून,त्यांचे दारिद्रय दूर करून आणि निरोगी आणि

चांगले वातावरण तयार करून,हँड्स अप फॉर किड्स ( Hands Up 4 Kids)  द्वारे केनिया मधील मुलांचे जीवन सुधारले जाते.

आर्ट ऑफ लिव्हिंग, IAHV आणि Hands Up 4 Kids यांच्या द्वारे हाती घेतलेल्या  प्रकल्पांपैकी एक

नैरोबी येथील चिल्ड्रन्स गार्डन होम अँड स्कूल हा एक प्रकल्प आहे.

 

[अजुन वाचा]