- - आयुष्यात आपण जे काही करतो ते आनंद मिळविण्यासाठीच, होय नां ?
- - परंतु दुर्दैवाने, जे हवे ते आयुष्यात नेहमी आणि सहज मिळत नाही..
- - हॅपिनेस प्रोग्रॅम केल्याने तुम्ही पुन्हा एकदा अगदी सहजपणे अमर्याद अशा आनंदाच्या मूळ स्रोताशी जोडले जाल..आणि या आनंदाचा स्त्रोत म्हणजे : ' तुम्ही स्वत '
आनंदाची चावी दडली आहे तुमच्या श्वासात.
जाणून घ्या श्वासाचे रहस्य.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोणत्याही प्रशिक्षकाला, त्यांच्या कधीही न विरणाऱ्या हास्याचे रहस्य विचारले तर अतिशय साधे पण सखोल उत्तर मिळेल : “श्वासाच्या सहाय्याने”. हे खरंच एवढे सोपे आहे कां? चला तर मग जाणून घेऊया.
आपल्या कधी लक्षात आले आहे का, आपल्या भावनांनुसार आपल्या श्वासाची लय बदलते? जेंव्हा आपण रागावलेले असतो तेंव्हा श्वासाची लय कशी असते? उथळ आणि लहान श्वास. जेंव्हा आपण तणावमुक्त आणि आनंदी असतो तेंव्हा? आपण दीर्घ आणि सखोल श्वास घेतो. यावरून हे स्पष्ट होते की आपल्या भावनांचा प्रभाव श्वासावर पडतो, मग आपल्या नकारात्मक भावना श्वासाच्या सहाय्याने रूपांतरित करता येतील कां? नक्कीच !
सुदर्शन क्रियेच्या सहाय्याने जीवनातील स्वाभाविक आनंदाची लय पुनरुज्जीवित करा.
प्राचीन ज्ञानाचा आधुनिक काळात वापर.
शरीरातील सर्वाधिक विषारी द्रव्ये श्वासातून बाहेर टाकली जातात. अशाप्रकारे शरीरातील बराचसा भावनिक आणि शारीरिक कचरा निघून गेल्यावर तुमचा जीवनाबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो.
मला अजून जाणून घ्यायचे आहे..
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रॅमचा मुख्य भाग म्हणजे अतिशय प्रभावी आणि खास अशी श्वासप्रक्रिया : सुदर्शन क्रिया. शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये नैसर्गिक लय प्रस्थापित करणारे प्रत्यक्ष साधन. सुदर्शन क्रियेने लक्षावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
सुदर्शन क्रियेचे वैशिष्ट्य निव्वळ तिच्यातच नाही तर तिच्या निर्मितीतही आहे, कारण गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांना दहा दिवसांच्या मौनानंतर सुदर्शन क्रिया प्राप्त झाली.
आजपर्यंत कधीही न मिळालेला आनंद अनुभवणे हे सुदर्शन क्रियेसोबतच इतर प्राणायामाचे प्रकार, योगासने, ध्यान आणि हॅपिनेस प्रोग्रॅममधील चर्चा सत्रात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे सहज शक्य आहे.
स्वत:ला झोकून द्या.
हॅपिनेस प्रोग्रॅमचा अनुभव घ्या.
पाण्यात पडल्याशिवाय पोहण्याचा अनुभव कसा घेता येईल? हॅपिनेस प्रोग्रॅमचे प्रशिक्षक तुम्हाला प्रत्येक चरणावर अतिशय सहजपणे मार्गदर्शन करतील.
वय, पार्श्वभूमी आणि शारीरिक तयारी या पैकी कशाचाही विचार न करता, कोणीही हॅपिनेस प्रोग्रॅमचा तरल अनुभव घेऊ शकतो. मुळात जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही पात्र आहात.
फक्त काही तासांच्या हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये जे काही शिकवले जाते ते सर्व (तंत्र, प्रक्रिया, प्रत्यक्ष करण्याच्या गोष्टी) तुम्ही सहजपणे अवगत करू शकता. तुम्ही अगदी शांत, मनमोकळे, निरोगी, अधिक सज्ञान आणि आनंदी व्यक्ती होऊन घरी परतता, तेही सर्व फायदे आयुष्यभर टिकवण्यासाठी, आवश्यक ती सर्व आणि सहज करण्यासारखी तंत्रे शिकूनच.
आनंदी मन तुम्हाला शांती, अधिक चांगली निर्णयक्षमता देते आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता वाढवते. थोडासा आनंददेखील आपले जीवन कसे बदलून टाकते, हे शिकण्यासाठी खालील फॉर्म भरा.
पूर्व अट नाही.
- त्यांनी अनुभवले..
- मी गमावले / मी कमावले
"आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम ही मला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे. ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि ज्या आध्यात्मिक प्रक्रिया शिकविलया गेल्या, त्या सर्वांमध्ये खूप प्रेम होते. मी आनंदी आहे, माझ्याकडे सामर्थ्य आणि शांतता आहे. संपूर्ण विश्व या कार्यक्रमाचीच वाट पाहत होते.” डँनियल मेंडेझ, लेखक, ह्यूस्टन, टेक्सास
"मी भाग्यवान आहे की मी १० वर्षांपूर्वी हा कार्यक्रम केला, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एकाही अश्या व्यक्तीला भेटली नाही जी हा कार्यक्रम करून दुःखी आहे. मला दिसले केवळ आनंद, ज्ञानाची गहनता, जे चुकीच्या दिशेने जात होते त्यांच्यात बदल करण्याचा उत्साह." – गोर्डाना टीहोमीरोविक, फ्रेंच प्रोफेसर, क्रोशिया
"हँपीनेस कार्यक्रमात प्राचीन ज्ञानाची आणि आधुनिक दैनंदिन जीवनाची सांगड योग्य प्रकारे घातलेली आहे. आजच्या व्यस्त आणि तणावयुक्त जीवनात काही तास काढणे आवश्यक आहे. तुमच्या भावनांना कशाप्रकारे हाताळावे, प्राचीन ज्ञानाचा तुमच्या दररोजच्या जीवनात कसा मिलाफ करावा याची व्यावहारिक तंत्रे मिळवणे हे फारच महत्वाचे आहे.." - राउल अलवारेझ, आयटी विशेषज्ञ, पँरागुए
मी काय गमावले
- तणाव
- रहस्यमय प्रकारे येणारी उदासी,वाईट मन:स्थिती जी आपल्याला थकवून टाकते.
- अशा वेळा जेव्हा उर्जा कमी असते आणि कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाहीत.
- नकारात्मक भावना/ अनुभवांना दाबून टाकण्याची सवय
- चार-चौघांसमोर बोलण्याच्या आत्मविश्वासाची कमी
- माझ्या विचारांना व्यापून टाकणारी निराधार भीती
- शरीरातील ते हट्टी दुखणे जे वारंवार परतून येत
मी काय कमावले
- ताणण्याच्या कल्पनेला नवीन आयाम देणारी व्यावहारिक अस्त्रे
- निरोगी मन आणि निरोगी शरीर
- बोलण्यात आणि वागण्यात सहजपणा आणि आत्मविश्वास
- कामगिरीत कार्यक्षमता – मला जे काय करायचे त्याकरिता अधिक मोकळा वेळ
- माझ्या भविष्यावर परिणाम करणारे निर्णय घेण्यात स्पष्टता
- उर्जेच्या पातळीमध्ये भरपूर वाढ ज्यामुळे मला तरुण झाल्यासारखे वाटते.
- ओसंडून वाहणारा उत्साह आणि आनंद जो मला कधीच सोडून जात नाही