अनेकांना नियंत्रण करणे बंद करण्यात समस्या असते. याचा परिणाम होतो तो चिंता, अस्वस्थता वाढण्यात आणि नातेसंबंध खराब होण्यात.
जागे व्हा आणि पाहा, तुमच्या नियंत्रणात खरोखर काय आहे? तुम्ही काय नियंत्रित करू शकता? कदाचित तुमच्या जागृत अवस्थेतील एक अणुमात्र भाग आहे कां? होय की नाही?
तुमच्या निद्रावस्था किंवा स्वप्नावस्था यावर तुमचा काहीच निर्बंध नाही. तुमचे विचार आणि तुमच्या भावना यांना तुम्ही आवर घालू शकत नाही. त्या तुम्ही व्यक्त कराव्यात अथवा नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता परंतू त्या तुमच्यामध्ये डोकावतात ते तुमच्या पूर्वअनुमती शिवाय! तुमच्या लक्षात येत असेल की शरीराची अनेक कार्ये अशी आहेत जी तुमच्या नियंत्रणात नाही. आणि हेच लागू पडते तुमच्या आयुष्याच्या आणि संपूर्ण विश्वाच्या बाबतीत. त्याचप्रमाणे तुम्हाला काय वाटते , तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना किंवा या जगात घडणाऱ्या घटना यावर तुमचा ताबा आहे ? हा तर एक विनोद आहे.
जेंव्हा तुम्ही या दृष्टीकोनातून गोष्टींकडे पाहता तेंव्हा तुम्हाला नियंत्रण घालवून बसण्याची भीती वाटण्याचे काही कारण नाही. कारण तुमच्या ताब्यात काहीच नाहीये. हे तुमच्या लक्षात येवो अथवा न येवो पण जेंव्हा तुम्ही नियंत्रण करण्याच्या भावनेला सोडून देता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने निश्चिंत होता. मी कोणीतरी आहे ही तुमची ओळख तुम्हाला संपूर्णपणे आराम करू देत नाही आणि त्यामुळे तुमचे क्षेत्र मर्यादित राहते.