चिंतेवर मात करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय | Simple yet effective tips on how to overcome anxiety

चिंतेमुळे आपल्या व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक जीवनात अडथळा येतो आणि त्याचा त्रास होतो. सगळ्यात वाईट बाब हि की, हा अंतर्गत मामला आपल्या शरीरावर घडणारे दुष्परिणाम सोबतीला घेऊन येतो. जसे, तुम्हाला सुटलेला थरकाप प्रारंभी चेहऱ्यावर घाम आणतो आणि घशाला कोरड पाडतो. हिच लक्षणे नंतर वाढत जाऊन मलावरोध, छातीचे दुखणे आणि निद्रानाश ओढवू शकतात. सरळ सांगायचे म्हणजे चिंतेची ही लक्षणे नंतर आजारांचा बराच मोठा पसारा वाढवतात.

तथापि या साऱ्या विस्तृत लक्षणामागील मूळ कारण एकच आहे: शरीरातील वात दोषाचे (वायू तत्व) असंतुलन.

कोणत्याही दोषाला संतुलित करण्यासाठी त्या व्यक्तीने त्या विशिष्ट दोषाच्या विरुद्ध असलेली आहारपद्धती टाळणे आणि पोषक जीवनशैलीचे काटेकोर पालन करणे. वात दोषाचे गुणधर्म म्हणजे तरलता, कोरडेपणा, शीतप्रवृत्ती आणि खडबडीतपणा हे आहेत. याचा समतोल साधण्यासाठी आहारपद्धती आणि जीवनशैलीत असे बदल करावयास हवेत की ज्यामुळे ऊब, जडपणा आणि स्निग्धपणा लाभेल.


तुमच्या चिंतेसाठी दुष्परिणाम विरहित उपाय | Your side-effect free anxiety toolkit

१. वाताचे शमन करणारा आहार घ्या

२. तुमच्या शरीर प्रणालीला वनौषधींच्या साह्याने शांत करा

३. विशेष आयुर्वेदीक मसाजचा लाभ घ्या

४. नियमित दिनचर्या पाळा

५. योग, प्राणायाम आणि ध्यान करा


१. वाताचे शमन करणारा आहार घ्या

आपल्या आहारात गोड, खारट आणि आंबट चवीच्या पदार्थांचा समावेश करा. तूरट, कडू आणि तिखट स्वादाचे अन्न टाळा. गोड पदार्थ म्हणजे नैसर्गिकपणे गोड असलेले पदार्थ जसे फळे. साखरेचा अंतर्भाव असलेल्या मिठाया नको. थंड आणि कोरड्या पदार्थांच्या ऐवजी उष्ण, तेलकट आणि ओलसर पदार्थांचा अंतर्भाव आहारात करा.


२. तुमच्या शरीर प्रणालीला वनौषधींच्या साह्याने शांत करा

अश्वगंधा, शंखपुष्पी आणि ब्राम्ही सारख्या काही वनौषधी आपल्या मज्जासंस्थेला शिथिल करतात आणि मेंदूतील विषाणू बाहेर काढतात. तथापि त्यांचे सेवन करण्या अगोदर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या शरीर प्रकृतीनुसार औषधे सुचवितात. योग्य अशा वैद्यकीय चिकित्सेसाठी एखाद्या श्री श्री आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्या.


३. विशेष आयुर्वेदीक मसाजचा लाभ घ्या

शील अभ्यंग या विशेष आयुर्वेदिक मसाजने शरीराला खोलवर आराम मिळतो. यात विशेष आयुर्वेदिक तेले आणि पाण्यात तापविलेल्या बसाल्ट स्टोनचा वापर केला जातो. ह्या स्टोनची उष्णता वात दोषाच्या असंतुलनाचे शमन करते आणि शरीर आणि मनाला गहरी विश्रांती लाभते.


४. नियमित दिनचर्या पाळा

नियमित दिनचर्येमुळे वात दोषाचे संतुलन करणे सोपे जाते. म्हणून आपल्या झोपण्याच्या - उठण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळायला हव्यात.


५. योग, प्राणायाम आणि ध्यान करा

योग, प्राणायाम आणि ध्यानाच्या साह्याने चिंतेवर प्रभावीपणे मात करता येते हे आता वैज्ञानिकरित्या सिद्ध झाले आहे. म्हणून या प्राचिन तंत्राच्या सरावासाठी आपल्या रोजच्या दिनचर्येतील थोडा वेळ राखून ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरते. याच्या सरावाने तुम्हाला शांतता लाभेलच, सोबत तुमची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढते.

​-आपल्या जवळच्या केंद्रात श्री श्री योगा आणि हॅपिनेस प्रोग्रॅमच्या माध्यमातून तुम्ही योग, प्राणायाम आणि ध्यान शिकू शकता.

उपचारपद्धतीचा अवलंब करू शकता.

पुढचा लेख वाचा चिंतायुक्त विकारावर मात करण्यासाठी ९ योग सूत्रे | Cure anxiety-disorder with yoga in Marathi