आनंदाची गुरुकिल्ली

आयुष्यात आनंदी राहण्याची किल्ली एकच: ‘मी, मला, माझे, ह्याच्यात अडकायचे नाही (म्हणजे स्वत:च्या आशा आकांशा किंवा भौतिक सुखे). त्यापेक्षा काहीतरी भव्य दिव्य करायचे असे ठरवा. किंवा आजूबाजूच्या लोकांची सेवा करायचे ठरवा. मग बघा, आनंदाचा धबधबाच तुमच्या आयुष्यात उतरेल. दुसरी महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायची की ‘ती दिव्या शक्ती’ तो परमात्मा, जो कोणी आहे तो माझ्यावर आत्यंतिक प्रेम करतो, तो माझी अगदी सतत काळजी घेत आहे. तो मला एकटा सोडणार नाही. माझ्यात काही त्रुटी असल्या तरी त्या तो भरून काढेल’. हे एकदा कां आपल्या मनात ठसले की, आनंदी आनंदच !

जरा लक्षात घ्या, आयुष्यात तुम्ही काय करायचे हे जरी ठरवले तरीसुद्धा ते तेवढेच किंवा दुसरे कांही, तुम्ही आयुष्यभर तर करू शकणार नाही. ह्याचप्रमाणे तुमच्या शक्तीबाहेरचे कामही तुम्ही करू शकणार नाही. याचाच अर्थ, तुम्ही जे काही काम करणार ते तुमची काम करण्याची क्षमता आणि वेळ-अवेळ यावरच अवलंबून असेल. उदाहरणार्थ बघा, नुकतेच जन्माला आलेले मुल ! ते बाळ ५ ते १० वर्षाचे होईपर्यंत कित्येक गोष्टी त्या बाळाला करताच येत नाहीत. त्यामुळे सर्वच गोष्टीसाठी त्या बाळाला दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. तर तसेच लक्षात घ्या, ह्याचप्रमाणे आजचे तुम्ही काही वर्षांनी जेव्हा ७०-८०  च्या घरात जाल, तेव्हा तुमचे तुम्हालाच जाणवेल, खूपच थोड्या गोष्टी आपण आपल्या आपण करू शकत आहोत. किंबहुना आपल्या आसपासच्या लोकांवरच आपण आता अवलंबून आहोत.

हा जो मधला काळ आपल्या आयुष्यातला असतो, तेव्हाच आपण काहीतरी करून दाखवायला समर्थ असतो. अर्थात, त्या वेळीसुद्धा आपण आपल्या क्षमतेनुसारच जे काही करता येईल तेवढेच करू शकतो हेच खरे !

लक्षात घ्या, एकच माणूस, एकाच वेळी, इंजिनियर, डॉक्टर किंवा ऑफिसर होऊ शकत नाही. तर त्याच्या क्षमतेनुसार तो ह्यापैकी एकच कोणीतरी होऊ शकतो. म्हणजेच प्रत्येकाची क्षमता वेगवेगळीच असते आणि वेळेचे बंधन हेही प्रत्येकावर वेगवेगळेच असते. (अर्थात ते त्या वेळी प्रत्येकाच्या वयावर असते.)

प्रत्येकाची क्षमताही वेगवेगळी असते. आपल्या क्षमतेलाही मर्यादा आहेतच. जी गोष्ट, तुम्ही १० वर्षापूर्वी ज्या सहजतेने करत होतात, तसे आज करू शकाल, याची खात्री नाही, हो कि नाही? तसेच आज जे काही तुमची करत असाल तेच काम २० वर्षानंतर इतक्या सहजतेने करू शकाल याची काय खात्री? म्हणजेच आपली क्षमता आणि वेळ (वय) यावर आपले काम करण्याचे सामर्थ्य अवलंबून असते.

अशावेळी आपण आठवायचे कि ती जी सर्वोत्तम शक्ती आहे आणि ती माझ्याशी पूर्णपणे जुळलेली आहे, जी माझ्या सर्व गरजा आणि इच्छा नक्कीच पुरवणार आहे ती कायमच माझ्या पाठीशी आहे. ही गाढ श्रद्धा जेव्हा तुम्ही मनात ठेवलं तर कायमच नक्की आनंदी रहाल.

जस जसे वय वाढते आपली क्षमता व ताकद हळूहळू क्षीण होत जात. हे अगदी नैसर्गिक आहे. तुम्ही पहात असाल आपल्या आजूबाजूला, बरेच जण वय वाढल्या नंतर ते थोडे विष्पण होतात किंवा त्यांना कायम असुरक्षित वाटत राहते. त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख आणि क्लेशच सतत दिसते. जसे जसे वय वाढते ते आणखीच दु:खी दिसतात. पण, खरा भक्त तसा नसतो. जो खरा भक्त असतो, तो मात्र, जस जसे वय वाढते, अधिकच आनंदी दिसतो. अधिक उल्हासित दिसतो. अधिक हंसरा होतो आणि कायमच आनंदी राहतो. त्याला मनात माहित असते, ‘मी हे सारे पहिले आहे आणि मला समजले आणि उमजले आहे. म्हणून मी अंतकरणातून आनंदी आणि तृप्त आहे. मला खात्री आहे, देव माझ्या गरजा पुऱ्या करण्याकरीता कायमच माझ्या पाठीशी असेल आपणही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.

मी एकदा दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो. तिथल्या वृद्धाश्रमातले लोक मला भेटायला आले होते. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच मला खुप निराशाजनक वाटले. “काय बर झाले असेल ह्यांना? हे इतके दु:खी कां दिसत आहेत”, हाच विचार माझ्या मनात येत राहिला. त्यांच्या मुलांनी त्यांना, त्यांच्याच घराबाहेर काढून वृद्धाश्रमात टाकले होते. मुलांच्या अशा वागल्यामुळे ते खचून गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. जणू ते कित्येक वर्षात हसलेच नाही.

आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तिकडच्या शिक्षकांना मी सांगितले, “या सर्वांना आपल्या आनंदी रहा” ह्या कार्यक्रमात सहभागी करून घ्या. त्यांना साधना करायला शिकवा, आणि त्यांना ज्ञानाच्या मार्गावर आणा. एका ठराविक वयानंतर कोणालाही नवीन काही शिकणे त्रासदायक वाटते. असे कां होते? काय होते की, जसजसे वय वाढत जाते आपली नजर आणि ऐकण्याची शक्ती हळूहळू कमजोर होते. आपण, सारे पाहत असतो किंवा सारे ऐकत असतो, पण आपले मन ते ग्रहण करू शकत नाही, किंवा समजू शकत नाही मग आपण अगदी अध्यात्मिक सुधा काही ऐकले तरी ते कदाचित वरवरच राहील, अंत:करणात झिरपणार नाही. म्हातारपणी माणसाची अशी अवस्था होते.

मग मी तिकडल्या इतर लोकांना पण सांगितले. “पाहिलेत ना, म्हातारपणी काय से होते ते? तेव्हा आत्ताच तुमच्या समोर काही भव्य दिव्य ध्येय ठेवा व त्याकरिता स्वत:ला वाहून घ्या आणि सदैव ज्ञानातच रहा. मोहाला आणि जिव्हाळ्याला बळी पडू नका. फक्त घराचा मुलाबाळांचा विचार करत त्यातच अडकून राहू नका.

त्या वृद्धांनी त्यांच्या आयुष्यात काय स्वस्ता खाल्ल्या असतील त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. “आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना उच्च स्तरावर न्यायचे आहे” याकरिता किती कष्ट करून त्यांनी पैसे कमावले असतील. एवढे सारे काही करूनही त्यांचीच मुले त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेली आहेत. त्यांना सांभाळण्याकरिता आश्रमाची आवश्यक ती फी देऊन मोकळे होतात. कधीतरी वर्षातून एकदा आपल्या पालकांना भेटायला येतात किंवा भेटायला नाहीच जमले तर पालकांना पत्र पाठवतात. कधी “मातृदिन” तर कधी ‘पितृदिन’ च्या निमित्त्ताने ! त्या गरीब बिचाऱ्या वृद्ध आई-वडिलांची खरेच कींव येते.

पण आपल्या जवळ जेव्हा अशी अभंग श्रद्धा असते कि, “तो परमात्मा सतत माझ्याबरोबर आहे जो माझाच आहे आणि माझ्यावर त्याचेही आत्यंतिक प्रेम आहे, आणि कधीही मला तो दुरावणार नाही.” त्या श्रद्धेच्या बळावर आपल्याला खूप सामर्थ्य मिळते. आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो. त्या आनंदने आपने चमकत राहतो. कधीही पुसणार नाही असे स्मित आपल्या चेहऱ्यावर हसत राहते. म्हणूनच ‘अध्यात्म’ हि जीवनाची आत्यंतिक गरज आहे. हि ‘परमार्थ-निष्टा’ आपल्या आयुष्यात असीम आनंद, उत्साह-आस्था, अंतर्ज्ञान आणि स्वत्वाचा साक्षात्कार घडवून आणते, साहजिकच आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात.

-श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रवचनातील उतारा