राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) नेमलेली समिती पक्षपाती, अशास्त्रीय आणि विश्वासार्ह नसलेली आहे | NGT is biased

राष्ट्रीय हरित लवादाच्या समितीने दिलेल्या अहवालावरील आर्ट ऑफ लिविंग चे उत्तर !!

राष्ट्रीय हरित लवादाच्या अहवालातील सर्व मुद्दे आर्ट ऑफ लिव्हिंगची बदनामी करण्याच्या हेतूने मांडलेले दिसतात.

 

बंगलोर १७ ऑगस्ट २०१६ : हरित लवादाची समिती पक्षपाती आहे हे स्पष्ट आहे. खालील मुद्यांवरून त्यांचा पक्षपातीपणा व्यवस्थित स्पष्ट होतो.

1

वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हलच्या आधी घाई घाईने तेथील जागेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंदाजानेच १२० कोटी रुपयांची रक्कम  भरपाई म्हणून द्यावी असे सांगण्यात आले. त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगला तज्ञाच्या समितीचे अध्यक्ष असलेले शशी शेखर यांनी हरित लवादाला लिहिलेल्या एका  पत्राचा शोध लागला, ज्यात त्यांनी ,"ही  अनवधानाने झालेली चूक" असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या अविचारीपणाचा हा स्पष्ट पुरावा आहे.

2

आधी अशी अशी चूक केल्यामुळे हे अगदी  स्पष्ट आहे की आत्ता त्यांनी सादर केलेला अहवाल हा त्यांच्या आधीच्या निष्कर्षांचे समर्थन करणाराच असणार, अन्यथा त्यांची विश्वासार्हता जाईल. त्यांची ही  चूक आणि हा पक्षपात लक्षात आल्यामुळे हे लक्षात येते की या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी  ही  समिती योग्य नव्हती. आमच्या सूचनेनुसार  हरितलवादाने तज्ज्ञाची एक स्वतंत्र  समिती  नेमायला  हवी होती . हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती आणि अविश्वसनीय असा आहे. असा अहवाल कसाकाय स्विकारता येईल ?

3

या तज्ञांच्या समितीतील एक सदस्य प्रा. सी आर बाबू हे  अर्जदार मनोज मिश्रा यांच्या बद्दल प्रचार करत होते. त्यांनी माध्यमांना एक मुलाखत दिली ज्यात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगवर आरोप केले आणि शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंगने WCF च्या मैदानाचे  नुकसान केले आहे असे बिनबुडाचे विधान केले. यावरून त्यांचा पक्षपात स्पष्ट होतो.

4

हरित लवादाच्या समितीचे आणखी एक सदस्य ब्रिज गोपाल यांचा अर्जदार मनोज मिश्रा यांच्यांशी जवळचा  संबंध आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एकत्रपणे आणखी काही प्रकल्पात एकत्र तपास केला आहे. त्यांच्याबरोबर प्रकल्प हाती घेतले आहेत, तसेच एकत्र प्रवासही केला आहे. या   गोष्टी याआधी आमच्यासमोर उघड केल्या नव्हत्या. 

या सर्व गोष्टींचा ताजा अहवाल तयार करताना विचार केलेला दिसत नाही. ते ज्या निष्कर्षाला आले आहेत त्याची योग्य कारणे दिलेली नाहीत. कोणतेही विश्लेषण केलेले नाही, खोलवर तपास केलेला नाही तसेच  या निष्कर्षांना पूरक असे तपासणी अहवाल जोडलेले नाहीत. त्यामुळे हे पुन्हा स्पष्ट होते की  अहवाल म्हणजे केवळ समितीच्या सदस्यांचे मत आहे.  WCF च्या मैदानाचे  वास्तव चित्र यातून दिसत नाही. कोणताही शास्त्रीय अभ्यास किंवा विश्वासार्हता नसले ला हा अहवाल कसा स्वीकारायचा?

हा अहवाल अशास्त्रीय तपासावर आधारित आहे. अहवालास शास्त्रीय आधार असणे आवश्यक आहे. परंतू गेल्या चार महिन्यात त्यांना तथाकथित नुकसान झाले आहे असे दर्शवणारे एकही शास्त्रीय आधार अहवालास जोडता आलेला नाही . यामुळे समितीच्या विश्वासार्हतेबद्दल गंभीर प्रश्न  निर्माण  होतो.

5

समितीने  WCF च्या जागेला 'पाणथळ जागा' म्हटले आहे. परंतू नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दिल्लीच्या पाणथळ जागेच्या नकाशांच्या पुस्तकात, , १९८६ सर्व्हे ऑफ इंडिया चा नकाशा किंवा शासनाच्या कोणत्याही अधिकृत कागद पत्रांमध्ये  ही जागा "पाणथळ जागा" म्हणून दाखवलेली नाही. या जागेस पाणथळ जागा असे संबोधून समिती पर्यावरण मंजुरी आवश्यक असल्याचा चुकीचा अर्थ लावत आहे. सत्य हे आहे की या जागेचे वर्गीकरण  नेहमीच सँडी  फ्लड प्लेन (वालुकामय पूर पठार) असे केले गेले आहे.५.

6

ही जागा ठोकून घट्ट केली असे म्हणणे हेही पूर्णपणे अविचारी वक्तव्य आहे. शास्त्रीय वास्तव हे आहे की या रेताड मातीच्या गुणधर्मानुसार ती कधीही ठोकून घट्ट करता येणार नाही !

7

ही जागा आम्ही सपाट करून घेतली हे म्हणणेही अगदी मूर्खपणाचे आहे. जर आम्ही ती सपाट केली असेल तर १९८५ मध्ये त्याची नोंद सपाट जागा म्हणून कशी झाली असेल ? तज्ञांच्या समितीतील सदस्यांनी जो काही दावा केला आहे त्यात काहीच अर्थ नाही. या आणि अशाच आणखी काही गोष्टी विचारात घेता असे दिसून येते की समितीचा हेतू केवळ आर्ट ऑफ लिव्हिंग ला बदनाम करणे हाच आहे. समितीने सादर केलेला पुरावा म्हणजे केवळ शास्त्रीय फसवणूक आहे.

 

अधिक माहितीसाठी / प्रतिसाद देण्यासाठी संपर्क - webteam.india@artofliving.org