गुरुचे अस्तित्व (Guru Pornima 2013 in Marathi)

 

श्रीमती भानुमती नरसिंहन :

न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम् ||

शिव शास्नाथ, शिव शास्नाथ, शिव शास्नाथ, शिव शास्नाथ ||

 

 

भगवान महादेवांनी जाहीर केले आहे की, गुरूच्या पलीकडे कोणीही नाही. गुरु ही संकल्पना अनंत काळापासून आहे. ते एक चिरंतन तत्व आहे. गुरु, आत्मा, मंत्र आणि इष्ट (देवता) या सर्व एकच शक्ती आहेत. तुम्ही जितके गुरुच्या जवळ जाल तितके तुम्हाला जास्त स्पष्ट होत जाते.

जवळ येणे म्हणजे काय ? गुरु म्हणजे केवळ एक शरीर नाही. गुरुचे अस्तित्व तुम्हाला अनेक मैल दूरूनही जाणवू शकते आणि तुम्हाला उन्नत झाल्याची जाणीव येऊ शकते. तरी ही जे प्रत्यक्षपणे त्यांच्या सान्निध्यात आकंठ बुडतात ते भाग्यवान असतात. गुरुपौर्णिमा ही तुमच्या गुरुच्या सान्निध्यात राहण्याची आणि या मंगल दिनी त्यांचा आशिर्वाद घेण्याची एक उत्तम संधी आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी, दरवेळी तुम्हाला तुमच्या भक्तीची, तुमच्या परिपूर्णतेची आणि तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांच्या कसे उपयोगी पडू शकता याची आठवण करून दिली जाते. जीवनात येणाऱ्या अडचणी हा तुमचा पाया मजबूत करणारा एक घटक आहे. काही अतिशय कठीण प्रसंग म्हणजे आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आहे. त्यावेळी तुम्ही खरोखरच पुनर्विचार करण्याच्या मनस्थितीत असता. पॉलिश करून, पेट्रोल भरून पुन्हा भरारी घेण्याची ही वेळ आहे. तुमचा ज्ञानासोबत असलेल्या कराराचे नुतनीकरण म्हणजे गुरुपौर्णिमा. तुमच्या जीवनात गुरु असला की तुम्ही दृढ निश्चयी रहाता आणि तुमचा आत्मविश्वास पक्का होतो. गुरुचे नेहमीच उदात्तीकरण केले जाते कारण जीवनात ती एक मोठी मानसिक शक्ती आणि आधार आहे. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील सुख आहे.

गुरु तुमचे जीवन नेहमीच परिपूर्ण करतात. त्यामुळे एक समाधानाची, तृप्तीची भावना येते. गुरुच्या सान्निध्यात जीवन हे पूर्ण चंद्राप्रमाणे आहे याची जाणीव होण्याचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. जीवन समृद्ध, परिपूर्ण आणि आल्हाददायक होऊन जाते. कुणीतरी सतत काळजी घेत आहे अशी भावना गुरुच्या सान्निध्यात तुम्हाला येते. हृदय उमलून येते आणि डोक्यातील काळजी संपते.

गुरु तुम्हाला तुमच्या उच्च चेतनेशी जोडतात. त्यामुळेच त्यांच्या सान्निध्यात तुम्हाला काहीही कारण नसताना प्रसन्न आणि आनंदी वाटते. गुरुच्या सानिध्यात ध्यान करणे हे उद्धार करणारे असते. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असता तेव्हा सत्व (शुद्धता) प्रभावी असते. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला गहिऱ्या ध्यानाचा अनुभव येतो. आपण साहजिकच आनंदी राहू लागतो. हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आणि दैवी प्रेम आणि परमानंदाची अनुभूती येते. 

तुमच्यातील दैवी प्रेमाचा अनुभव घेण्याची क्षमता म्हणजे परिपूर्णता. प्रत्येक गोष्ट भौतिक नसते. काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही केवळ अनुभवू शकता त्या समजावून सांगता येत नाहीत. आपलेपणाची भावना, संबंध असण्याची भावना, श्रेष्ठ प्रतीची चेतना जी उच्च मितीला पोहोचण्याचा मार्ग, अशी गूढ अनुभूती गुरुची प्रत्यक्ष उपस्थितीच तुम्हाला देऊ शकते.   

कोणत्याही बुद्धीला विस्तारीत चेतना समजणार नाही. ती गूढ आहे, पकडण्यासारखी नाही. तुम्हाला ती जाणवेल पण वर्णन करता येणार नाही. तुमच्या आयुष्यातले सर्व सुंदर अनुभव अवर्णनीय असतात–परम आदर, सौंदर्य, कृतज्ञता, निरागसता हे मोजता येत नाही. ते हृदय भारून टाकतात आणि बुद्धीच्या पलीकडचे असतात.

जीवनाचे गूढ पूर्णपणे जगणे ही गूढता आहे आणि हे केवळ सिध्द गुरुच्या सान्निध्यातच शक्य आहे.

गुरुपौर्णिमेला तुमची शक्ती चेतावण्यासारखी / चार्ज करण्यासारखी असते इतकी सारी कृतज्ञ भक्तांची मांदियाळी–अगदी गूढ वातावरण असते. असे वाटते की हा जीवनात एकदाच येणारा अनुभव आहे. असे जीवन जगणे म्हणजे सार्थक झाल्यासारखे वाटते. मी हे कितीतरी वेळा अनुभवले आहे आणि दर वेळी मला वाटते की हेच सर्वात  जास्त सुंदर आहे. मी पुढच्या वेळेची वाट बघते आहे. जीवन म्हणजे गुरुच्या सान्नीध्यातला जादुई आणि गूढ असा आनंद आहे.   

लेखिका, ४ ते ६ फेब्रुवारी २०१३ या दरम्यान होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला परिषदे’ च्या अध्यक्षा आहेत.

पहा @bhanujgd on twitter.

 

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  www.artofliving.org/mr

Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri