आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम
प्रत्येक व्यक्ती मध्ये अफाट अंतः शक्ति दडलेली असते ज्याची त्याला जाणीवही नसते. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सच्या माध्यमातून ह्या शक्तीची जाणीव होऊ लागते आणि आपल्या ख-या स्वरूपाची ओळख होऊ लागते.
सुदर्शन क्रियेच्या हि एक विशिष्ट नैसर्गिकरित्या लयबद्ध पद्धतीने श्वास घेण्याची क्रिया आहे ज्याच्या अभ्यासाने® मन अचल व स्थिर होते. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडतील अश्या अनेक गोष्टी / साधने कोर्स साभागीना शिकविल्या जातात.
आर्ट ऑफ मेडीटेशन कोर्स: सहज समाधी ध्यान
दि आर्ट ऑफ मेडीटेशन म्हणजेच सहज समाधी ध्यान ही ध्यानाची एक अशी शक्तिशाली व सरल पद्धती आहे जी सचेतन मनाला आपल्या प्रगाढ स्वरूपाची जाणीव करून देते.
संस्कृत मध्ये ‘सहज’ म्हणजे विनासायास किंवा अप्रयास आणि समाधी म्हणजे विश्रांतीपूर्ण तरीही आनंदपूर्ण असलेली सजगता जी सर्व विचारांच उगमस्थान आहे. ही अवस्था जागृतावस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्थेच्या पलिकडे आहे. उर्जा, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा हा अमर्याद साठा आहे आणि असीम शांतता आणि स्थिरचित्त यांचे स्थान आहे.
येस!+ कोर्स
विशेष करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यातील अफाट क्षमतेचा अनुभव घेण्यासाठी. येस!+ कोर्सची रचना केलेली आहे. ह्या कोर्सद्वारे ही क्षमता आपल्यात असल्याचे जाणवू लागते आणि तुमचा स्वत:कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो. तसेच तुम्ही कोण आहात आणि या आयुष्यापासून तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्ट होते. सुदर्शन क्रिया® एक असे तंत्र आहे, ज्यात श्वासाच्या विशिष्ट, नैसर्गिक लयीतून तुम्ही मुक्त होण्याचा अनुभव घेता. तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात आनंदी जीवन जगतच ध्येय गाठण्याची एक शक्ती, आणि आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप अधिक विकास करून मोठे होण्याची क्षमता आहे..