आशिया मधील काही झोपडपट्ट्या ते अमेरिकेतील अब्जाधीश कार्पोरेट संस्था ते युरोपमधील छोट्याश्या वस्तीतील छोटी शाळा ते युद्धप्रणव राष्ट्रामधील तणाव मुक्तीसाठीच्या छावण्या – सर्व ठिकाणी सुदर्शन क्रिया अनेक-अनेक व्यक्तींना संजीवक ठरली आहे.
गेल्या २९ वर्षामध्ये सोप्या, लयबद्ध श्वसन प्रक्रियेचे- सुदर्शन क्रियेचे असंख्य आणि वेगवेगळे लाभ झालेले करोडो साक्षीदार आहेत. सुदर्शन क्रिया अद्वितीय आहे कारण ती वैश्विक आणि समाजातील अनेक स्तरामध्ये फायदेशीर आहे, जी विविध पार्श्वभूमी, मान्यता,धर्म, विचारसरणी आणि वयोगटामध्ये चांगले आयुष्य जगण्यासाठी साधन बनली आहे. सुदर्शन क्रिया तत्त्वज्ञान किंवा लिंग किंवा राष्ट्रीयत्व या छोट्या छोट्या बंधनात न रहाता टी चेतनेच्या स्तरावर काम करते, हेच यामागचे रहस्य आहे.
सुदर्शन क्रियेच्या दैनंदिन सरावामुळे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू खुलतात ज्यामुळे व्यक्ती आनंदी, परिपूर्ण बनते.