श्री श्री रवी शंकर
‘आनंद शोधणे’ हे मानवी स्वभावाचे मूळ वैशिष्ट्य आहे. आनंद प्राप्तीसाठी माणसे काय काय करतात, पाहिले तर खूपच चमत्कारिक आहे आणि ती यादी लांबलचक आणि कधीही न संपणारी आहे. वास्तविकपणे आनंद आपल्या मध्येच असतो, मात्र तो आपण बाहेर शोधत असतो. पंचेंद्रियांद्वारे सुख मिळते, मात्र आत्म्याची गरज आणखी काही वेगळी असते. जेंव्हा पंचेंद्रियांद्वारे मिळणारे सुख पुरेसे वाटत नाही, तेंव्हाच त्या व्यक्तीला स्वर्गीय, दैवी अनुभवाची गरज भासते. या शोधाची प्रेरणा प्रत्येकांमध्ये असते, जिच्यामुळे त्या व्यक्तीच्या अध्यात्मिक प्रवासाची सुरवात होते. काही व्यक्तींना या प्रवासामध्ये आडमार्गाची भुरळ पडते आणि ते पोहचतात अंमली, मादक पदार्थांपर्यंत. अंमली पदार्थामुळे खूप उच्च वाटते आणि लोक म्हणतात की त्याच्यामुळे चेतनेत बदल जाणवतो. परंतु अखेरीस तिच्यामुळे आपले संपूर्ण व्यक्तिमत्वच छिन्न -विछिन्न होऊन जाते. त्या व्यक्तीला अपेक्षित स्वातंत्र्य, प्रेम आणि आनंद प्राप्त न होता बंधन, नैराश्य आणि दु:ख प्राप्त होते. व्यसनाची परिभाषा - ‘काहीतरी प्राप्त करणे आनंददायी नसून प्राप्त न करणे दु:ख दायक होते’ अशी होते.
अध्यात्मिकता अशा ठिकाणी मोठी भूमिका करू शकते. जगभरात ध्यान, श्वसन प्रक्रिया, प्राणायाम आणि सत्संग, अंमली पदार्थ आणि मद्य या सारख्या व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी सहाय्यक ठरली आहे. कित्येक व्यक्ती आपला अनुभव व्यक्त करताना म्हणतात की, सुदर्शन क्रियेचा अनुभव हा त्यांना अंमली पदार्थाच्या सेवनाचा अनुभव देतो, ते देखील चेतनेला हानी न पोहचवता. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सायकोएकटीव अंमली पदार्थाचे व्यसन जडते कारण ते आनंद आणि समाधान, पूर्णत्वाचा भास निर्माण करणाऱ्या डोपामाईन या न्युरोट्रान्समीटर मध्ये लहर निर्माण करतात. ध्यानामुळे देखील डोपामाईन ची पातळी सरासरी ६५% ने नैसर्गिकपणे वाढते, हे संशोधनांती सिध्द झाले आहे. समुहाने गायल्यामुळे, सत्संगमुळे देखील व्यक्ती बऱ्याच तासांसाठी आनंदी आणि उत्साही राहते. या सर्व सरावांमुळे मन खंबीर होते आणि म्हणून त्या व्यक्तीला अंतस्थ उच्चानुभवांसाठी बाह्य अंमली पदार्थाच्या सेवनावर विसंबून रहावे लागत नाही.
पुनर्वसनासाठी सेवा भाव वाढवणे ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ‘मला आणखी काय मिळू शकते’ या मनोभूमिकेमुळे मन व्यग्र आणि उदास बनते. तर ‘मी कशी सेवा करू शकतो’ हा दृष्टीकोन आनंद आणि स्वातंत्र्य मिळवून देतो. दृष्टिकोनातील या बदलामुळे आयुष्याला एक उद्दिष्ठ प्राप्त होतेच शिवाय ती व्यक्ती व्यसनमुक्त होणे सुरु होते. भक्कम निराकरण आणि योग्य दिशेने योग्य प्रयत्न, यांच्यामुळे व्यसनाचा जुना पगडा सुटणे सुरु होऊन खरे स्वातंत्र्य जाणवू लागते.
अध्यात्मिकतेमुळे व्यसनमुक्तीवर औषधी उपचारांसोबतच ती मनातील अस्वस्थता, बैचेनी रोखणेस मदत करते. ज्यांच्या मनाचा कल अध्यात्मिकतेकडे आहे असे युवक सहजासहजी अंमली पदार्थ सेवन करत नाहीत. अध्यात्मिकतेमुळे मानवी मूल्यांनी युक्त चरित्रवान व्यक्तिमत्त्व बनते, जी तणावयुक्त नकारात्मक दबावावर कवच म्हणून कार्य करते.
नेहमीच अल्प काळाचे सुख दीर्घ काळासाठी दु:ख देते आणि एकमेव अध्यात्मिक शिक्षणच असा शहाणपणा देते ज्याच्यामुळे आपण अल्प काळासाठी थोडोशी गैरसोय झाली तरी तिच्यामुळे आपण कायमस्वरूपी आनंद प्राप्त करू शकतो.