किती चांगला निर्णय घेतला आहे.यामुळे किती नकली नोटा जाळल्या जात आहेत माहित आहे ?.ज्यांचाकडे नकली नोटा होत्या किंवा खुपसा काळा पैसा आहे ते भीतीपोटी काही ठिकाणी बॅगेत भरून जाळत आहेत कारण त्यांना २००% द्यावे लागतील.२०१४ ची पूर्ण निवडणूक भ्रष्टाचाराच्या विरोधात होती आणि ज्या आश्वासनामुळे आपले प्रिय पंतप्रधान पुढे आले ते त्यांनी पूर्ण केले.हे सगळे अचानक नाही केले.
पहिल्यांदा सांगितले सर्वांची बँकेत खाती उघडा.बँकेत करोडो लोकांची खाती एका वर्षात उघडली गेली,जे इतक्या वर्षात होऊ शकले नव्हते ते विशेष घडले.हे सत्तर वर्षात झाले नव्हते.पहिल्यांदा ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांचेदेखील खाते उघडले.
त्यानंतर सांगितले काळा पैसा घेऊन या.३० सप्टेंबरच्या आत सगळे जमा करा.तुम्हाला माफ केले जाईल,हि देखील सुट दिली.आता साम,दाम भेद,दंड असतो ना,त्यात अखेरला दंडा असतो.आता कोणी हां हां करेल वा नाराज झालेत तर तो त्यांचा गैरसमज आहे.३० सप्टेंबरपूर्वी प्रामाणिकपणाने केले असते तर ठीक होते.
दीर्घकालीन लाभ
जे घडतेय त्यात अल्पकालीन त्रास असला तरी दिर्घकालीन लाभासाठी सहन करण्यायोग्य आहे.दिर्घकालीन दृष्टीकोनातून पाहाल तर यातच देशाचे भले यातच दिसत आहे.सर्वसाधारण व्यक्ती एक फ्लॅट तसेच छोटा जमिनीचा तुकडा खरेदी करू शकत नव्हता अशी परिस्थिती देशात आली होती.जमिनीचे भाव अस्मानाला भिडले होते.अश्या सर्व गोष्टींवर यामुळे आळा बसला.ज्याच्यामुळे कल्याणच कल्याण होईल असे गरजेचे पाऊल उचलले गेले.थोडा थोडका त्रास होत आहे,अडचणी येत आहेत,मी समजतो कि त्या नगण्य आहेत.
स्वयंसेवकांचे कार्य
आज आपले स्वयंसेवक जागोजागी बँकेत,एटीएम बूथजवळ लोकांना पाणी देण्यासाठी किंवा जे तणावग्रस्त आहेत,नाराज आहेत त्यांना समजवण्यासाठी,त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी सर्वत्र जात आहेत.त्या स्वयंसेवकांचा अनुभव आहे कि लोक अगदी आरामात,हसत खेळत,गप्पा मारत त्यांना जे काम करायचे आहे ते करताहेत.कोठेही भांडण तंटा पहायला मिळाला नाही.थोडे इकडे तिकडे होत असेल तर स्वयंसेवक तेथे थांबतील,त्यांना शांत करतील,त्यांना पाणी देतील.दोन तीन तास भुकेले उभे असतील तर त्रास होतोच,त्यांना काही खायला देतील.सर्वाना समजाऊन वृद्धाना प्राधान्य देतील आणि देत आहेत.हि कामे आपले स्वयंसेवक ठिकठिकाणी करत आहेत.मी त्यांच्या कामाचे कौतुक करतो.बँकअधिकारी देखील रात्रंदिवस काम करत आहेत.एका दिवसात त्यांच्यावर इतका बोजा आला कि पूर्वी त्यांनी इतके काम कदाचित केले नसेल.स्वयंसेवक त्यानाही प्रसन्न ठेवताहेत,प्रोत्साहन देत आहेत.कितीतरी लोक हे काम करण्यासाठी गेलेत.येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये हे गरजेचे आहे,माहित नाही घरात लग्न आहे कि आणखी काही काम आहे ते सर्व सोडून देखील लोक बँकेत आपापले काम करू लागलेत.शनिवार आणि रविवारची सुट्टी सोडून देखील लोक काम करताहेत.
जागोजागी जे कोणी स्वयंसेवक आहेत त्यांनी जाऊन बँक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करा,त्यांना प्रोत्साहन द्या,त्यांचा उत्साह वाढवा.घाबरायची गरज नाही,पन्नास दिवस दिले गेलेत तुम्हाला.एकाच दिवशी एटीएम वर तुटून पडण्याची आवश्यकता नाही.आरामात जाऊ शकतो आणि आपली जी कष्टाची कमाई घरी ठेवलेली आहे त्यांना काही काळजी करायची गरज नाही.बँकेत केंव्हाही जाऊन जमा करू शकता,पन्नास दिवस आहेत आपल्याकडे.घाबरण्याची अजिबात गरज नाही.
श्री श्री रविशंकरजी यांनी या विषयावर ट्वीट (Tweet) देखील केले आहे
मैं उन सब से अनुरोध करता हूँ जो काले धन के नोटों को जला रहे हैं कि वे ऐसा ना करें, बल्कि गरीब व सूखे से पीड़ित किसानों में बाँट दें।
— Gurudev Sri Sri Ravi Shankar (@SriSri) November 11, 2016
मी अश्या सर्वांना आवाहन करतो जे काळ्या पैशांच्या नोटा जाळत आहेत की त्यांनी असे करू नये, तर गरीब आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये त्या वाटाव्यात.
All over India @ArtofLiving volunteers are helping people standing in queues & bank officials to make their working smooth. #DeMonetisation pic.twitter.com/NdY7IWu41D
— Gurudev Sri Sri Ravi Shankar (@SriSri) November 13, 2016
भारतभर आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक रांगांमध्ये उभे राहीलेल्या लोकांना आणि बँक अधिकाऱ्यांना त्यांचे काम सुलभ व्हावे यासाठी मदत करत आहेत.
अनेक ठिकाणी जाऊन स्वयंसेवक काम करत आहेत आणि बँक अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अश्या परिस्थितीत लोकांना मदत करणे खरोखर एक आदर्श आहे. या लेखामध्ये दिसणारे सर्व फोटो देशातील विविध राज्यातील आहेत. हि सेवा/ कार्य सर्व ठिकाणी असेच चालू राहील.