बुद्ध हे नास्तिक होते कां? (Was Buddha an Atheist in Marathi)

शुद्ध नास्तिक सापडणे एकदम अशक्य आहे. नास्तिक तो असतो जो अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही ज्या ठोस आणि मूर्त नाहीत.परंतू जीवनात सर्व काही ठोस आणि मूर्त नसते.आणि विश्व सुद्धा ठोस आणि मूर्त नाही आहे. व्यवसाय असो, विज्ञान असो वा कला असो, या सर्वांमध्ये थोडेफार तर्क, थोडेसे  गृहीत धरणे, थोडीशी कल्पकता आणि काही अंतःप्रेरणा यांचा समावेश आहे. हे सर्व स्वभावतः दिव्य असतात आणि यातील एकही मूर्त नसते. ज्याक्षणी एक नास्तिक एखादी अशी गोष्ट स्वीकारतो  जी स्पष्टीकरण करण्याच्या कक्षेच्या बाहेर असते त्याक्षणी तो नास्तिक उरत नाही. कोणतीही बुद्धिमान व्यक्ती हे जीवन आणि विश्व यातील रहस्यांना कधीही पूर्णतः नाकारत नाही आणि म्हणूनच ते प्रामाणिकपणे नास्तिक होऊ शकत नाही! स्वतःला नास्तिक म्हणवणारे जे आहेत ते केवळ देवाच्या काही संकल्पनांचा जाहीरपणे विरोध दर्शवित असतात.

प्रश्न: बुद्ध हे नास्तिक होते कां?

श्री श्री: एका दृष्टीने “नाही”. कारण त्यांनी शून्यतेचा उघडपणे पुरस्कार केला जो नास्तिकाला स्विकारणे अतिशय अवघड आहे आणि दुसऱ्या प्रकारे “होय” कारण त्यांनी देव ही संकल्पना कधीही मान्य केली नाही.

जिम: जे त्याला दिसते त्यावरच एक नास्तिक विश्वास ठेवतो परंतू बुद्ध म्हणाले की, 'जे तुम्ही पाहता ते सत्य नाही.'

श्री श्री: वर्तमानातील सर्व नास्तिक जर बुद्ध होऊ शकले असते तर!

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf