निराकार किंवा साकार ह्या दोन्ही रूपात देवाला पाहणे कठीण आहे. देवाला निराकार म्हटलं तर तो खूप गूढ वाटतो आणि साकार म्हटलं तर खूप मर्यादित वाटतो. म्हणूनच काही लोकं नास्तिक राहण पसंत करतात.
पण निरीश्वरवाद वास्तवात असूच शकत नाही. ती फक्त एक सोयीची बाब आहे. तुम्ही सत्याच्या शोधात असाल, तर निरीश्वरवाद टिकूच शकत नाही. ईश्वर नसल्याचा पुरावा दिल्याशिवाय तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. नास्तिक लोकं ईश्वर नसल्याचा पुरावा दिल्याशिवाय त्याचं अस्तित्व नाकारतात. ईश्वराचं अस्तित्व नाकारण्यासाठी प्रचंड ज्ञान लागते. पण तुमच्याकडे प्रचंड ज्ञान असेल तर तुम्ही ईश्वराचं अस्तित्व नाकारूच शकत नाही. (हशा). एखाद्या गोष्टीच अस्तित्व नाकारण्यासाठी पूर्ण ब्रम्हांडाच ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणूनच कोणीही १००% नास्तिक असूच शकत नाही. नास्तिक म्हणजे खरंतर सुप्त अवस्थेतील आस्तिक.
माझा कशावरच विश्वास नाही म्हणायला आधी स्वत:वर तर विश्वास असावा लागतो. स्वत:ची ओळख नसताना देखील तो स्वत:वर विश्वास ठेवतो.
नास्तिक (स्वत:शी) प्रामाणिक असूच शकत नाही कारण प्रामाणिकपणा असायला (स्वत: मध्ये / स्व मध्ये) खूप खोलवर जावं लागतं पण नास्तिक हे करायला तयार नसतो. कारण जेवढ्या खोलवर जाल तेवढं शून्यात पोहोचाल जिथे सर्व काही शक्य आहे. बरीच अशी काही गुपितं आहेत जी आपल्याला माहित नाहीत हे त्याला मान्य करावच लागेल. ह्याच्यासाठी तो तयार नसतो कारण ज्या क्षणी नास्तिक व्यक्ती प्रामाणिक बनेल, त्या क्षणी तो स्वता:च्या नास्तिक्तेवरच विश्वास गमावून बसेल.
जेव्हा नास्तिक व्यक्तीला आपल्या अज्ञानाची जाणीव होते, त्यवेळेस तो काय करेल? तो कुठे जाईल? गुरु त्याला काय सांगेल? त्यासाठी ( पुढच्या नॉलेज शीट) ची वाट बघावी लागेल.
इंडियन इंसटीटयूट ऑफ सायन्सच्या बंगलोर येथे गुरुजींनी शास्त्रज्ञ व संशोधकांच्या परिषदेला संबोधित केले. “विज्ञानाला मानवतेची जोड” ("Bridging Science to Humanity") या विषयावर परिसंवाद आयोजित केल्या बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांचे सल्लगार डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी गुरुजींची स्तुती केली. मोझांबिक देश हा आर्ट ऑफ लिविंग च्या नकाशा वरचा १०९ वा देश ठरला.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.