श्री श्री रविशंकर :
असे नसते की अवतार हा एका वेळी फक्त एकाच ठिकाणी हजर असतो आणि त्याच वेळी आणखी कुठे हजर नसतो.उदाहरणार्थ राम आणि परशुराम हे दोघेही विष्णूचा अवतार आहेत असे मानले जाते आणि ते दोघेही समकालीन होते.अवतार हा दिव्यत्वाच्या फक्त एका भागाचे प्रतिनिधित्व करतो.दिव्यत्वाचा एक भाग सगळीकडे आणि सगळ्यात असतो.जिथे कुठे हा दिव्यत्वाचा अंश स्वत:ला अशाप्रकारे पूर्णपणे व्यक्त करतो की ज्याचे आपल्याला दर्शन होऊ शकते तोच अवतार असतो.देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कुठेही अभिव्यक्त होऊ शकतो,प्रगट होऊ शकतो.
श्रीराम हा अवतार ‘मर्यादा पुरषोत्तम’ आहे असे म्हटले जाते.(सर्वश्रेष्ठ आणि धर्माने चालणारा पुरुष) पण तरीही नम्रपणे तो सर्व ऋषींना खाली वाकून चरण स्पर्श करीत असे.सर्वांना अतिशय मानाने आणि आदराने वागवीत असे. अगस्ती ऋषींच्या पायाशी बसून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले होते.त्यांची महानता अशी होती की त्याने लक्ष्मणालाही रावण रणांगणावर मरणप्राय स्थितीत असताना त्याचे चरणस्पर्श करून त्याच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेण्यास सांगितले होते.श्रीराम म्हणाले ,“ मी जर त्याच्याकडे ( रावणाकडे ) गेलो तर तो देहत्याग करून माझ्यात विलीन होईल.तर असे होण्याच्या आंत जा आणि त्याच्याकडून जे काही शिकता येईल ते शिक.त्यानंतर मी त्याला दर्शन देईन आणि त्याचा आत्मा माझ्यात विलीन होईल.”
आणि बाकीच्या बऱ्याच अवतारांत,तुम्हाला जर मासा( मत्स्य अवतार ),डुक्कर( वराह अवतार),कासव( कुर्म अवतार ),सिंह( नृसिंह अवतार ),हंस,कावळा वगैरे तुमच्या भोवतीच्या सगळ्यामध्ये आणि अगदी ज्याने हजारो क्षत्रियांचा वध केला त्या परशुरामातही देव दिसला तर तुम्हाला सर्व सृष्टीमध्येही,तुमच्या अवती भोवती सगळीकडे दैवत्व दिसेल.त्यानंतर अशी कोणतीच गोष्ट नसेल ज्यात तुम्हाला दैवत्व दिसणार नाही.तर देव कोण्या एका प्रांतापुरता,देशापुरता किंवा काळापुरता मर्यादित आहे असे समजू नका.देव सर्वव्यापी आहे आणि या सृष्टीतल्या प्रत्येक अणू रेणूत स्थित आहे.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri