अध्यात्मामध्ये आपली मूळे रुजविलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने जगभरातल्या लाखो लोकांमध्ये धरतीमातेबध्दल प्रेम आणि आदर रुजवला आहे.भलेही पृथ्वी दगड,माती आणि पाण्याने बनली असेल,पण अध्यात्मामुळे तिच्याकडे मातेच्या रुपात बघण्याची आणि काळजी घेण्याची दृष्टी येते.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या,जगभरातल्या स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन काही पर्यावरण-प्रकल्प सुरु केले आहेत,जसे - मिशन ग्रीन अर्थ (Mission Green Earth) म्हणजेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड.प्रदूषित नद्यांच्या शुद्धीकरणासह जल संवर्धन आणि संरक्षण,गरीब शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने आणि आर्थिक आधार देणारी शून्य खर्चाधारित (zero budget) रसायन मुक्त शेती,जी शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने आणि कमी खर्चात शेती करायला शिकवते.
भविष्यात नैसर्गिक साधन-संपत्तीचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी युवकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.हे जाणून आर्ट ऑफ लिव्हिंगने दीर्घकालीन विशेष जागृती प्रकल्प ( Deepening Roots-Broadening Vision) या नावाने चालू केले आहेत.