शांती (Peace projects in Marathi)

“जागतिक पातळीवर गेली काही वर्षे फारच आव्हानात्मक होती.बहुतांशी सगळीकडे अनेक आंदोलनांचा उद्रेक आपण पाहिला.आजच्या समाजात आंदोलन निर्माण करणे सोपे झाले आहे.नैराश्य आणि तणाव अत्त्युच्च पातळीवर पोहोचले आहेत.कोणतेही साधंसं कारण भावना भडकण्यासाठी आणि लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी पुरेसे होते.तरीसुद्धा,आंतरिक शांती निर्माण करणे,लोकांना शांतपणे,अहिंसात्मक पद्धतीने निषेध करायला शिकवणे आणि आनंदी राहून कार्य करून एकत्रित,रचनात्मक कृती करणे हे अतिशय आव्हानात्मक आणि कौशल्यपूर्ण आहे.आर्ट ऑफ लिव्हिंगने संपूर्ण जगभर असे नम्र प्रयास केले आहेत.ज्यामध्ये करोडो लोक परिवर्तनाच्या दिशेने उभे ठाकले.आज,मी आनंदी आहे कारण लोकांनी ध्यान धारणेचा स्वीकार केला आहे आणि राष्ट्र उभारणीसाठी आंतरिक शांतीचे महत्व ते मान्य करीत आहेत.” ..गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. 

प्रस्तावना..

आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना १९८१ मध्ये झाल्यापासूनच,त्याचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी  हे शांतता कार्यात मग्न आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये अध्यात्म हे सामाजिक कार्य करण्यास बळकटी आणि जबाबदारी निर्माण करते.यासाठी आवश्यक असणारी इच्छा आणि उर्जा निर्माण होते ती जागतिक शांततेच्या आवश्यकता समजल्यामुळे. 'तणावमुक्त आणि हिंसामुक्त जग' या श्री श्री यांच्या स्वप्नामुळे याला जोर मिळतो आणि म्हणूनच शांततेची कृती (अॅक्शन फॉर पीस) ही तातडीची गरज बनते.

युद्ध किंवा कोणत्याही प्रकारची दुर्घटना यामुळे त्या भागातील जनता ही कायम भय,घोर चिंता आणि विश्वासघाताच्या भावनेत जगते.त्यांच्या अंतरात तिरस्कार आणि सूड घेण्याची भावना ज्वलंत असते.आर्ट ऑफ लिव्हिंग,अॅक्शन फॉर पीस (शांततेची कृती) द्वारा,या सर्व तणावांपासून सुटका करणारे आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन देऊ करणारे खास कार्यक्रम राबवते.अपराधी आणि पिडीत दोघांनाही समान अनुकंपा दाखवली जाते.विविध पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्रित शांतपणे नांदवणे,हे अॅक्शन फॉर पीसचे ध्येय आहे

श्री श्री – शांतीदूत..

ज्या देशांची अशांतीने कोंडी झाली आहे त्यांच्याकरिता श्री श्री हे शांतीदूत बनले आहेत.संघर्ष करणाऱ्या गटांना वाटाघाटी करायला एकत्र आणून त्यांनी हिंसात्मक परिस्थितीला शांत केले आहे.आर्ट ऑफ लिव्हिंग विविध धर्म आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते आणि अश्या प्रकारे आंतर-धर्मीय शांती प्रस्थापित करते. पुढे वाचा

मानसिक / शारीरिक आघात झालेल्यांसाठी दिलासा देण्यासाठी कार्यशाळा (ट्रॅामा रिलीफ वर्कशॅाप)

"दबाव आणि तणाव ही हिंसेची मूळ कारणे आहेत,” असे श्री श्री म्हणतात. जेव्हा शारीरिक / मानसिक तणाव निवळतो तेव्हा मनःशांती मिळते आणि आपल्यातील सहकार्य,जबाबदारी,मैत्रीभाव आणि आपुलकीच्या भावना विकसित होतात.

ही सजगता आमच्या ट्रॅामा रिलीफ वर्कशॅापना दुर्घटना आणि युद्धकाळात प्रोत्साहित करते.युद्ध पीडितांना भय, चिंता आणि विश्वासघात या भावनांपासून मुक्तीचा अनुभव येतो.आंतरिक शांती प्रबळ झाल्यामुळे तिरस्कार आणि अपराध्यांचा बदला घेण्याच्या भावनांचे निर्मुलन होते.हिंसक अपराध्यांसाठी खास कार्यक्रम राबवले जातात ज्याच्यामुळे त्यांना समाजाकडे पाहण्याचा वेगळा,विस्तृत दृष्टीकोन मिळतो.यामुळे अतिरेकी आणि युद्धपिपासू यांच्यात इतके मोठे परिवर्तन घडून आले आहे की,त्यांनी स्वतःहून हिंसेचा मार्ग सोडून दिला आहे. आणखी वाचा

टिकून राहणारी शांतता..

आर्ट ऑफ लिव्हिंगने संपूर्ण जगात हजारो लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण केली आहे.यामुळे विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र आले आहेत,पूर्वग्रहदूषित धारणा कमी झाल्या आहेत आणि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांमध्ये शांततापूर्ण समजुतीची भावना निर्माण झाली आहे.

न्यूयॉर्कवरचा अतिरेकी हल्ला (सप्टेंबर २००१)

११ सप्टेंबर, २००१ या दिवशी अल-कायदाबरोबर जोडलेल्या एकोणीस मुस्लीम अतिरेक्यांनी एकत्रितपणे आत्मघाती हल्ले केले.हल्ल्यांच्या काही तासातच आर्ट ऑफ लिव्हिंग आणि तिची संलग्न संस्था,दि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हल्यूज (आयएएचव्ही) यांनी सार्वजनिक ट्रॅामा रिलीफ शिबिरे प्रारंभ केली ज्याचा फायदा १,०००हून अधिक साक्षीदार आणि युएसमधील रहिवासी पीडितांना झाला. अधिक वाचा