Dhangari Dhol | दिल्लीत गरजणार धनगरी ढोल - विश्व संस्कृति महोत्सव

धनगरी ढोल म्हटले की घुमतो नाद, मर्दानी बाणा, शिगेला पोहोचलेली उत्कटता

आणि मराठी मातीचा सुगंध - हाच तो नाद खुळा !!!

या पारंपारिक वाद्याचा मोह न आवरण्यासारखा, आवाज अनाकलनीय अनुभूती देणारा आहे. याच वाद्याने २१ फेब २०१० ला  गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले गेले  त्यामागे

कारण होते आर्ट ऑफ लिव्हींग च्या "अभंगनाद" कार्यक्रमाचे. एकूण ६५ गावातील १३५६ धनगरांनी एकत्र येवून हा कार्यक्रम सादर केला. यासाठी आशीर्वाद होते प पू श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे.

आज पुन्हा एकदा विश्व संस्कृति महोत्सवा साठी धनगरी ढोल कार्यक्रमाची निवड झाली आहे. यावेळी एकूण १००० धागरी ढोल  वादक आपली कला सादर करतील. अभिमानाची गोष्ट ही आहे की याच व्यासपिठावरती संपुर्ण जगभरातून / १५५ देशांतून ३३००० एकत्र येणारे कलाकार आपल्या देशाची पारंपारिक कला सादर करतील. भारतातून देखील काही राज्य आपल्या कला सादर करतील आणि यात मराठी मातीची पताका यावेळी महाराष्ट्रातील धनगरी ढोल फडकवेल. हे सर्व सादरीकरण दिल्लीला होणार आहे. ही खरोखरच अतुलनीय गोष्ट आहे.

सर्व सांस्कृतिक कलांना आणि संस्कृतींना भव्य जागतिक व्यासपीठ प्राप्त व्हावे तसेच  मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आनंद, शांती आणि प्रेम यांच्यासाठी हातात हात घालून सेवाकार्य करणाऱ्या भव्य मानवी समूहाला एका धाग्यामध्ये बांधण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक प पू श्री श्री रविशंकरजी यांनी विश्व संस्कृती उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे स्टेज ७ एकर असणार आहे आणि ३५ लाख लोक जगभरातून येण्याची अपेक्षा आहे. अशा "न भूतो न भविष्यती" कार्यक्रमाला उपस्थिती लावणे हे देखील एक भाग्याचे लक्षण आहे.

"आम्ही पूर्ण उत्साह आणि अधिकाधिक गतीने हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित आहोत, जेथे जीवन एक उत्सव और सम्पूर्ण विश्व एक परिवार बनेल." -  श्री श्री रविशंकर जी

विश्व संस्कृति महोत्सव - दिल्ली

१९८१ साली संस्थापित, आज १५२ देशांमध्ये स्वयंसेवकांवर आधारीत आर्ट ऑफ लिव्हींग ही संस्था सतत मानवी मुल्यांची जोपासना, विविधतेमध्ये एकता आणि आपल्या जगभरातील सेवा प्रकल्पांमुळे परिचित आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्वाने प्रेरित या संस्थेच्या ३५ वर्षे पूर्तीच्या निमित्ताने हा उत्सव होत आहे. यामध्ये महारष्ट्राला धनगरी ढोल सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.  अनेक जागतिक नेते, समाज सुधारक आणि तज्ञ येथे व्यासपीठावर उपस्थिती लावणार आहेत.

मानवी मूल्ये जपली जात नसतील, तर तुम्ही समृद्ध आहात म्हणणे निरर्थक आहे.” - श्री श्री रविशंकर जी

कार्यक्रम स्थळ  : मयूर विहार फेज्-१ मेट्रो स्टेशन च्या समोरचे मैदान, दिल्ली

दिनांक  : ११ से १३ मार्च ,२०१६

वेळ : प्रथम दिवस -संध्यकाळी  ५ वाजे पासून,

द्वितीय और तृतीय दिवस - सकाळी १० वाजे पासून

धनगरी ढोल   

महाराष्ट्राला अनेक लोककलांचे वरदान मिळाले आहे आणि या लोक कला जागृत ठेवण्याचे काम या मातीशी जोडलेल्या प्रत्येक मराठी मनाने केले आहे. आपल्या डोंगरात, कडे-कपारीत पशुपालनासाठी पशूंच्या मागे, कुटुंबापासून दूर, अत्यंत विषम हवामानामध्ये राहणारा धनगर समाज. याला वनौषधी तसेच विविध ठिकाणांच्या मार्गांचे ज्ञान असते. मनोरंजनासाठी नैसर्गिक साधनांच्यापासून ताल निर्माण करणारी वाद्ये बनवली गेली आणि त्यापेकीच एक धनगरी ढोल. ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत आहे पण ती लुप्त होत चालली आहे. ही लोकधारा धनगरी समाजाने विरोबाच्या (कुलदैवत) नावाने जागृत ठेवली आहे. हेच सारे त्यांच्या भक्तीतून आणि लोकगीतांमधून दिसून येते

   सुम्भरान मांडल गा सुम्भरान मांडल !! विरोबाच्या भक्तांनी सुम्भरान मांडल !!

याच लोक कलेचे पुनरुत्थान आर्ट ऑफ लिव्हींग च्या माध्यमातून होत आहे. याचा अनुभव कथन करताना आपले काही धनगर बांधव म्हणतात -

श्री श्रीरविशंकरजीं च्या अभंगनादच्या वेळी इतके धनगरी वादक जमा होतील ही अशक्यप्राय गोष्ट होती पण १३५६ वादक एकत्र जमले, लोककला सादर केली. त्यावेळी सगळ्यात उंचावर मला कला सादर करायची संधी मिळाली, ही रविशंकरजींची कृपाच आहे. अभंगनादमुळे आम्हाला ही कला विविध व्यासपीठावर सादर करायची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही आर्थिकरीत्या संपन्न झालो. आमची तरुण मुले जे या पारंपारिक व्यवसाय आणि कला यापासून दुरावली होती ती परत आली. विश्व संस्कृती उत्सव मध्ये मी माझ्या नातवासोबत निघालो आहे.” - श्रीपती बिरू माने, पेठवडगाव

 “आमच्या धार्मिक उत्सवांना देखील दीड-दोनशे समाजबांधव करतांना प्रयत्न करावे लागतात. आज विश्व संस्कृती उत्सवला दिल्लीला आम्ही हजारोंच्या संख्येने जात आहोत. आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांचे सराव, प्रवास, आहार आणि रहीवास याबद्दलचे व्यवस्थापन खूपच उच्च प्रतीचे आहे. आज आमच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये प्रत्येक दिवस तसेच कोणताही कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हींगच्याजय गुरुदेवनेच सुरु होतो. आमचे जीवन सर्वार्थाने संपन्न झाले आहे. याचे श्रेय गुरूजींनाच जाते.” -   पोपट डावरे, पट्टणकोडोली

विशेष प्रयत्न

या प्रकल्पासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आर्ट ऑफ लिव्हींग, कोल्हापूरचे प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि धनगरी ढोल वादकांचे स्वयंसेवक कार्यरत आहेत, विशेषतः विजय हाके, शेखर मुंदडा, मानसिंग जाधव, प्रशांत पाटील, डॉ. सौ. राजश्री भोसले-पाटील, डिंपल गजवानी, विनायक मुरदंडे.

यातील सहभागी वादक आणि स्वयंसेवक हे १२०० पेक्षा जास्त लोक कोल्हापूर ते दिल्ली एकत्र रेल्वे प्रवास आणि दिल्लीमध्ये एकाच छताखाली वास्तव्य करणार आहेत. अश्या या भव्य-दिव्य आणि पवित्र सादरीकरणासाठी सर्व स्तरांमधून हाथभार लावण्याची गरज आहे. आपल्याला यथाशक्ती जी पण मदत करण्याची इच्छा असेल किंवा यात सहभागी व्हायचे असेल तर यासाठी संपर्क -

विजय हाके : ०९४२२७४८९१० शेखर मुंदडा : ९८६०७५५५४४  राजश्री दिदी : ९८९०९६९९९६   डिंपल दीदी : ९८९००१९९९२ 

इमेल  :  vijayhakay@yahoo.co.in

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा  विश्व संस्कृति महोत्सव(वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf