सुदर्शन क्रिया कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आपल्या जवळपास होणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरामध्ये आपले नाव नोंदवा. या प्रक्रियेमध्ये श्री श्री राविशांकार्जींनी मार्गदर्शन केलेल्या ऑडीओ कॅसेटच्या सहाय्याने प्रशिक्षित प्रशिक्षकाद्वारे शिबिरा मध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते. सुदर्शन क्रिया ही वैयक्तिक अनुभवाची प्रक्रिया असल्यामुळे यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात.
सुदर्शन क्रिया शिकण्यासाठी खालील शिबिरांमध्ये सामील होणे गरजेचे आहे.
शिबीर | वयोगट | लाभ |
आर्ट एक्सेल | ८ ते १३ वर्षे | कलागुण, कौशल्यामध्ये निपुणता आणि मुलांमधील तणाव निघून जातो. |
युथ इम्पोवरमेंट सेमिनार | १४ ते १७ वयोगट | युवकांच्या जीवन कौशल्यामध्ये निपुणता. |
युथ इम्पोवरमेंट सेमिनार अँड स्कील्स | १८ ते ३२ वर्षे | नेतृत्व गुणामध्ये वृद्धी, आत्म विश्वास आणि नाते संबंधामध्ये सुधारणा. |
आर्ट ऑफ लिव्हिंग पार्ट १ | १८ वर्षे आणि त्यापुढील | निरोगी,आनंदी आणि तणाव रहीत जीवनासाठी |
अपेक्स | कार्पोरेट संस्था | संघवृत्ती आणि उत्पादकताद्वारे कार्पोरेट उत्कृष्टता प्राप्त करणे |
युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम (वाय.एल.टी.पी.) | १८ वर्षे आणि त्यापुढील | सामाजिक प्रगतीसाठी ग्रामीण युवकांना नेतृत्वगुणाद्वारे सक्षम बनवणे. |
- आपल्या वयोगटातील शिबिर करा. आर्ट ऑफ लिव्हिंगची शिबिरे २ कालावधी मध्ये होतात. ६ दिवसीय कालावधी ( दोन ते तीन तास दररोज, शनिवारी- रविवारी- अर्धा दिवस) ३ दिवसीय कालावधी ( शुक्रवार सायंकाळी पासून रविवारी दुपारपर्यंत)
- आपल्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र शोधा. आपल्या सोयीचा कालावधी निवडा.
- आपले नाव नोंदवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकाला संपर्क साधा.
सुदर्शन क्रिया ध्वनी कॅसेट आणि एम पी थ्री
आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबीर हे संवाद स्वरूपात बनलेले आहेत. या शिबिरामध्ये व्यक्ती जितक्या प्रमाणात सहभागी होतात तितका जास्त लाभ प्राप्त होतो, असा अनुभव आहे. यामध्ये कॅसेट वरची सुदर्शन क्रिया शिकल्यावर, एक ‘छोटी सुदर्शन क्रिया’ शिकवली जाते, जी आपण दररोज घरी करू शकतो.
मोठ मोठ्या समुहांना सुदर्शन क्रियेचे ज्ञान देण्याची पात्रता येण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांना खडतर आणि व्यापक प्रशिक्षण दिले जाते. शिबिराचा उत्तम अनुभव प्राप्त होण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तुमच्याशी व्यक्तिगत संपर्कात असून तुमच्याकडे व्यक्तिगत लक्ष देतात.
सुदर्शन क्रियेचा प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा वेगळा अनुभव असतो.
शिबिर पूर्ण झाल्यावर कॅसेट वरील सुदर्शन क्रिया करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलोअप सेंटरचा पत्ता जाणून घ्या जिथे आठवड्यातून एकदा फॉलोअप असतो. आर्ट ऑफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया एमपीथ्री स्वरूपात उपलब्ध नाही.
तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तकालायामधून प्राणायाम, ध्यान आणि योगासने यांचे मार्गदर्शन करणारे सीडीज खरेदी करू शकता.
सुदर्शन क्रियेची कॅसेट ‘विक्री साठी’ उपलब्ध नाही. हे ज्ञान निव्वळ आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांनी समाजासाठी करायचं आहे.
सुदर्शन क्रिया सुरक्षित आहे का?
सुदर्शन क्रिया विशेष कायदेशीर अधिकाराखाली ‘सुरक्षित’ असून विक्रीसाठी उपलब्ध नाही. मात्र तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तकालयामधून विविध प्राणायाम, ध्यान आणि योगासनांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या सीडी खरेदी करू शकता. कारण हे ज्ञान ज्यांनी खडतर आणि व्यापक प्रशिक्षण घेतलेले आहे अशा आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांद्वारा समाजाच्या हितासाठी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तुम्हाला व्यक्तिगत आणि काही विशिष्ट मार्गदर्शन हवे असल्यास ते करण्यासाठी तत्पर असतील. आर्ट ऑफ लिव्हिंग सुदर्शन क्रिया एम पी थ्री स्वरूपात उपलब्ध नाही.
जेव्हा तुम्ही शिबिरासाठी नाव नोंदणी कराल त्यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकाला तुमच्या आरोग्याशी निगडीत सर्व माहिती द्या (खास करून गर्भारपणा, उच्च रक्तदाब, मानसिक असंतुलन) आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तुमच्या आरोग्याशी निगडीत काही खास सूचना देतील.
Get to learn Sudarshan Kriya
