अस्तित्वाच्या ज्या स्तरात आपण अनुभव घेतो आणि साठवून ठेवतो त्याला 'स्मृती' (चित्त) म्हणतात. आपल्या स्मृतीचा स्वभाव कसा असतो याच्या कडे कधी लक्ष दिले आहे कां?आपली स्मृती नेहमी नकारात्मक गोष्टींना कवटाळून ठेवते. आयुष्यात १०० सुखद अनुभव येतात आणि १० दु:खद. पण चित्त कोणत्या अनुभवांना पकडून ठेवते?
थोड्या फार असुखद, नकारात्मक गोष्टी घडतात त्याच स्मृतीत रहातात. स्मृती ही फार अद्भुत आहे. तुमच्या बद्दल १० प्रशंसात्मक गोष्टी सांगितल्या आणि एक गोष्ट नकारात्मक सांगितली तर तुमच्या लक्षात काय राहते ?