दहशतवादी भित्रे असतात. जगभरात कोठेही जेंव्हा दहशतवादी घटना घडते तेव्हा आपण हेच ऐकतो कि हे एक घाबरट कृत्य आहे. एक भित्री व्यक्ती कार्यापासून पळून जाते परंतु त्याच्या मनात नकारात्मक भावना भरलेल्या असतात आणि लपुन छपून तो असली कृत्ये करत राहतो.
भगवत गीतेची एक शिकवण | One of the teachings of Bhagavad Gita in Hindi
असेच काहीसे अर्जुनाबाबतीत घडले. अर्जुन उद्विग्न आणि दुःखी कष्टी झाला होता आणि युद्धापासून पळून जाऊ इच्छित होता. भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले कि, ‘भित्रे बनू नको. हा दहशतवादाचा बदला आहे. शौर्य हाच एकमेव मार्ग आहे. जेंव्हा युध्द हा एकमेव पर्याय उरतो तेंव्हा युध्द कर आणि आपल्या कर्तव्याचे पालन कर.’
एक दहशतवादी आपल्या ओळखीमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अडकतो – त्याला तो लपवतो. त्याला काहीही कारण नसते आणि ती गोष्ट त्याला त्रास देत राहते. पण भगवत गीता व्यक्तीला त्याच्या ओळखीच्या पलीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करते, तर्काला जागृत करते आणि ज्ञानासाठी प्रेरित करते. तसे पहिले तर हा खरा दहशतवादाचा बदला घेणे होय.
एखाद्या पोलिसाचे, सैनिकाचे तसेच राजाचे कर्तव्य आहे कि आपले शुभचिंतक आणि कुटुंबियांसाठी नव्हे तर देशाप्रती त्याने निष्पक्ष व्हावे. दहशतवादी कधीही निष्पक्ष नसतात. सैनिक शूर असतात आणि दहशतवादी भित्रा असतो. सैनिक हिंसा रोखतो आणि रक्षण करतो. पण दहशत वादी दुःख आणि कष्ट देतो. भगवत गीता शौर्याचा ग्रंथ आहे – असे शौर्य जे भौतिक आणि अध्यात्मिक या दोन्ही स्तरावर गरजेचे आहे.
दहशतवादी बदल्याच्या भावनेने भरलेला असतो. योग्य कार्य ज्यामध्ये बदल्याचा लवलेश नाही, जे कार्य न्यायप्रवृत्त आहे, जे कार्य आपल्या आत्म्याची प्रगती करते आणि असे कार्य जे कठीण समयी देखील करणे गरजेचे असते अश्या कार्यांना भगवत गीता प्रेरित करते.
गेल्या ५१४९ वर्षाच्या भगवत गीतेच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही कि भगवत गीता वाचून कोणी दहशतवादी बनलाय. उलट महात्मा गांधींनी भगवत गीतेवर प्रवचने लिहिली आहेत, जी त्यांच्या अहिंसेची प्रेरणा होती. भगवत गीता हा मानवी उत्क्रांतीच्या हरएक घटनाक्रमाबाबत प्रशिक्षण देणारा आणि या विशाल सृष्टीतील हरएक स्तरावर प्रकाश टाकणारा एकमेव ग्रंथ आहे.
भगवत गीता आपणास कर्तव्याचे पालन करताना समता आणि समतोल राखण्याचे भान देते. श्रीकृष्ण प्रत्येकाला हाती शस्त्र घेऊन लढण्या – झगडण्यासाठी प्रवृत्त करत नाहीत. मात्र एक सैनिक बाजारात केळी तर विकायला बसणार नाही नां. त्याला शस्त्र उचलून आपल्या लोकांचे संरक्षण तर करावे लागेल नां.
जर भगवत गीता दहशतवादी ग्रंथ असेल तर जगातील सर्व लष्करी प्रशिक्षण केंद्रे दहशतवादी संघटना होय. ऐकायला खूप विचित्र वाटते नां? लेनिन, मार्क्स आणि माओ त्से तुंग यांनी आपल्या पदावर टिकून राहण्यासाठी लाखो लोकांना यातना दिल्या म्हणून न्यायालयांनी त्यांच्यावर बंदी घातली होती काय?
दहशतवादी स्वतः भित्रा असतो आणि इतरांना त्रास देतो तर सैनिक स्वतःचे प्राण त्यागून जनतेचे रक्षण करतो आणि त्यांचे जीवन शांतीमय बनवतो. हे दोघेही बंदूक चालवतात परंतु दोघांचे उद्देश्य एकदम विपरीत आहेत.
भगवत गीता तर्क आणि संवाद दोन्हीला चालना देते तर दहशतवादी कोणत्याही तर्काची पर्वा करत नाही आणि समस्त संवादाच्या विरुध्द असतो.
खूप मजेशीर बाब आहे कि हरएक लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये सैनिकाला शिकवले जाते कि त्यांचा शत्रू एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे जिचा त्यांना खातमा करायचा आहे. या शिक्षणामागे एक मनोवैज्ञानिक गोष्ट आहे कि जर ते शत्रूला एक मनुष्य समजू लागले तर त्यांच्यावर कधीही शस्त्र चालऊ शकणार नाहीत. अश्या अनेक प्रक्रिया शिकवतात ज्यांच्यामुळे कधीही सैनिक भावनांनी ग्रासले जात नाहीत.
अर्जुनासोबत हीच परिस्थिती झाली होती.
तेंव्हा भगवानांनी टप्प्या टप्प्याने, प्रारंभी अर्जुनाच्या भावनांना सांभाळले, मग त्याच्या अहंकाराला, मग मनातील विविध विचार आणि धारणांना. अखेरीस अर्जुनाच्या अध्यात्मिक चेतनेवर प्रकाश टाकला, त्याला अतिउच्च ज्ञान प्रदान केले आणि त्याच्या अविनाशी रुपाची ओळख करून दिली. या सर्वामुळे तर अर्जुनामध्ये अभूतपूर्व शक्तीचा उदय झाला आणि तो आपली प्रापंचिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रेरित झाला.
डॉक्टर आणि डाकू दोघेही माणसाचे पोट फाडत असले तरी डॉक्टरला आपण डाकू म्हणू शकत नाही.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात नां कि, “ज्याची बुद्धी निर्लिप्त आहे आणि जो राग - द्वेष यापासून मुक्त आहे, अश्या व्यक्तीने साऱ्या विश्वाचा नाश जरी केला तरी त्याला त्याचे पाप लागत नाही.”
जी बुद्धी राग - द्वेष यांच्या पासून मुक्त आहे ती स्वतः दहशतवादाची शत्रू आहे. जेंव्हा बुद्धी खूप आसक्त आणि द्वेषाने भरलेली असते तेंव्हाच दहशतवाद निर्माण होतो. भगवत गीतेमध्ये दिलेली उदाहरणे आणि उहापोह केलेली मानवी मुल्ये - अद्वितीय आहेत.
इसा मसिह देखील म्हणाले आहेत कि, “मी येथे शांती निर्माण करण्यासाठी आलेलो नाही. तर तलवार उचलण्यासाठी आलो आहे. मानवाला त्याच्या पित्याविरुद्ध, मुलीला तिच्या आईच्या, सुनेला तिच्या सासूच्या विरोधात उभा करण्यासाठी आलो आहे. कारण या प्रत्येकाचा शत्रू त्यांच्या कुटुंबातच असणार आहे.”
कुराणातील काही छंदांमध्ये देखील म्हणाले आहे नां कि, “काफिरांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे, त्यांची बोटे छाटून टाकावी .”
असे असताना देखील तुम्ही भगवत गीतेला दहशतवादाचा ग्रंथ म्हणणार असाल तर परत एकदा बायबल आणि कुराणातील या छंदांची उजळणी करणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती हि आहे कि कोणताही ग्रंथ दहशतवाद फैलावत नाही. तर –
जेंव्हा व्यक्तीच्या मनात तणाव आणि अज्ञान असते तेंव्हा तो आपली गैरकृत्ये लपवण्यासाठी ग्रंथांच्या आड लपतो.
रशियन न्यायालयात भगवत गीतेच्या विरोधात चाललेल्या दाव्याच्या वेळी डिसेंबर २०११ ला हा लेख लिहिला गेला. गीतेवर बंदी घालण्यासाठी चाललेला हा दावा रशियन न्यायालयाने काढून टाकला, निर्लेखित केला.