प्रेम आणि अधिकार (Love and authority Marathi)

प्रेम आणि अधिकार हे दोन्ही परस्परविरोधी वाटतात आणि तरीसुद्धा ती एकत्र नांदतात. व्यक्तीमधील चेतना जितकी अधिक जड असते तितका अधिकार स्पष्ट व्यक्त करावा लागतो. चेतना जितकी तरल तितका कमी अधिकार वापरण्याची गरज पडते. जेंव्हा व्यक्ती जड  असते तेंव्हा तुम्ही अधिकाराची मागणी करता आणि जेंव्हा तुम्ही अधिकाराची मागणी करता तेंव्हा प्रेमाला ओहोटी लागते. अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती ही आत्मविश्वास आणि प्रेम यांच्या कमतरतेचं दर्शक आहे. अधिकार जितका अधिक उघडपणे प्रदर्शित केला जातो तितकीच त्याची संवेदनशीलता आणि परिणामकारकता कमी होते.


एक समंजस व्यक्ती कधीही अधिकाराची मागणी करत नाही तर तो गृहीत धरतो. (हशा) एक कुशल उच्च पदस्थ अधिकारी तुम्हाला त्यांच्या अधिकाराची अजिबात जाणीव करून देत नाहीत. कारण अधिकार कदापि कुणाला प्रेरणा देऊ शकत नाही. तुमच्या बॉसपेक्षा तुमच्या इमानी नोकराचा तुमच्यावर अधिक अधिकार आहे, होय नां? एका तान्ह्या बाळाचा आईवर संपूर्ण अधिकार असतो. त्याचप्रमाणे तो जरी त्याचा वापर करीत नसला तरीसुद्धा एका साधकाचा देवावर समग्र अधिकार असतो. म्हणून तुम्ही जितके अधिक तरल होता तितका अधिक अधिकार तुम्हाला मिळतो. जितके प्रेम कमी तितका अधिकार अधिक उघडपणे व्यक्त होतो.

जर्मन आश्रमात जागतिक शांती करिता अनेक यज्ञ केले गेले. श्रीकृष्ण जन्म हा आनंद आणि उल्हासाने जर्मन आश्रमात साजरा केला गेला. श्री श्री आश्रमात पोहोचताच बंगलोरचे आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर आनंदी चेहऱ्यांची गजबजुन गेले.