दिवाळी | About Diwali in Marathi

“जीवनात जेंव्हा ज्ञानाचा उदय होतो, तेंव्हा उत्सव होतो. कोणत्याही उत्सवात आपण बेभान होतो, सजगता गमावण्याची शक्यता असते. प्राचीन ऋषीनां हे ठाऊक असल्याने त्यांनी प्रत्येक उत्सवासोबत काही पवित्र गोष्टी, काही धार्मिक विधी जोडून ठेवल्या आहेत, जेणेकरून आपण उत्सव साजरा करताना भान गमावणार नाही. या ! या दिवाळीत आपण ‘ज्ञान-उत्सव’ साजरा करूया आणि जीवनाप्रती कृतज्ञता अनुभवूया !”
- श्री श्री

काळ आणि आकाश तत्व अनंत आहे. वाळूचे कण मोजू शकत नाही. या ब्रम्हांडात अनंत अणू-रेणू आहेत, अनंत तारे आणि आकाश गंगा आहेत. तसेच आपल्या ग्रहावरील जीवन अनादी आणि अनंत आहे, जिचा ना प्रारंभ आहे ना अंत आहे, कारण जीवन गोलाकार आहे. एखाद्या गोळ्याची ना सुरवात असते, ना शेवट, ना कोणती दिशा ना कोणतेही लक्ष्य. सत्याची ना कोणतीही दिशा असते ना कोणतेही लक्ष्य. सत्य स्वयं लक्ष्य आहे आणि अनंत आहे.

दिवाळी काय आहे?

दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळी दिव्यांचा देखील सण आहे. साऱ्या सडका आणि इमारती रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून गेल्या आहेत. दिवाळीच्या चार आयाम आहेत:

  • दिवे लावणे : दिवाळीत उजेड करणे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवणे.
  • फटाके : जेंव्हा बाहेर एखादा स्फोट होतो तेंव्हा मनातील स्फोट उध्वस्त होतो, नष्ट होतो..फटाक्यांचे हेच महत्व आहे.
  • भेट वस्तू देणे-घेणे आणि मिठाई वाटणे : मिठाई सर्व प्रकारची कटुता संपवते आणि परत दोस्तीसाठी हात पुढे करण्याचे ते प्रतिक आहे.

समृद्धीचा अनुभव : आजच्या दिवशी आपल्याला जीवनात जे काही प्राप्त झालेय त्याप्रती आपण कृतज्ञ होतो.जेंव्हा जीवनात ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा जीवन उत्सव बनतो.मात्र उत्सवामध्ये आपण आपली सजगता गमावण्याची शक्यता असते.प्राचीन ऋषींना हे ज्ञात होते.म्हणून त्यांनी प्रत्येक उत्सावासोबत काही पवित्र क्रिया कर्मे,धार्मिक पूजा जोडल्या,जेणेकरून उत्सव साजरा करताना आपण आपली सजगता गमावणार नाही. या ! या दिवाळीत आपण ‘ज्ञान उत्सव’ साजरा करूया.

जीवनात कृतज्ञता अनुभवूया मग, आपणास आणखी प्राप्त होईल.