गाढ विश्रांती म्हणजेच परमानंद आणि परमानंद म्हणजे निव्वळ देवच आहे हे जाणणे,निव्वळ देवाचे अस्तित्व आहे हे जाणणे यातच गाढ विश्रांती आहे. “फक्त देवाचेच अस्तित्व आहे” ही खात्री किंवा अनुभूती म्हणजेच समाधी. समाधी हीच उपजत प्रतिभा, ताकत आणि सद्गुणांची जननी आहे. अत्यंत भोगवादी, भौतिक माणसाला सुद्धा समाधीची गरज आहे.कारण त्यालाही ऊर्जा आणि सद्गुणांची गरज भासते. समाधीत,ध्यानात जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रयत्नाची, कौशल्याची, ताकतीची किंवा गुणांची गरज नाही. तुम्ही पूर्ण कार्यक्षमतेने जगण्यासाठी समाधी अनिवार्य आहे.
कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक कार्यातून अलिप्त होणे म्हणजेच विश्रांती. आपल्या शरीरात ती 'झोप' या स्वरुपात अस्तित्वात आहे आणि झोप ही कार्यक्षमतेचा उत्तम मित्र आहे. समाधी ही जाणीवपूर्वक घेतलेली विश्रांती आहे. समाधी जीवनाचा उत्तम मित्र आहे.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी झालेला 'विश्व सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. या उत्सवाने संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणले.