सेंद्रिय शेतीचे धडे आता एफ.एम. रेडिओवर (Organic Farming Solution on Radio Marathi)

राम आशिष ०९०४४४४५०९४

कानपूर, उत्तरप्रदेश : बिरादरीच्या शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आता अनोळखी राहिली नाही. अकबरपुर तालुक्यामधील सामुहिक रेडिओ एफ. एम. (९१.२) वर आता सेंद्रिय शेती वर विशेष कार्यक्रम प्रसारित होतो आहे. ‘वक्त की आवाज’ या कार्यक्रमामधून २८६ गावांना आता सेंद्रिय शेतीची माहिती प्राप्त होत आहे.

आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक आणि सेंद्रिय शेती तज्ञ बालकृष्ण यादव हे रेडिओ निवेदिका नीतू यांच्यासोबत संवाद साधता साधता स्थानिक हवामानाच्या बदलांना अनुसरून सल्ला देतात.

या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका राधा म्हणाल्या, “जवळपास दोन लाख शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहीत झाले आहेत. ”त्यांनी हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांच्या पासून प्रेरणा घेऊन सुरु केला.

‘हमारा अन्न दाता’ या दर गुरुवारी सकाळी ७ आणि सायंकाळी ७ वाजता रेडिओ निवेदिका नीतू सिंह यांच्या द्वारा प्रसारित होणाऱ्या पंधरा मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांच्या योग्य लागवडीबाबत तज्ञ मार्गदर्शन प्राप्त होते. तसेच देशी गाईच्या मदतीने सेंद्रीय खते आणि किटकनाशके कशी बनवावी, ऋतुमानानुसार फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन कसे घ्यावे, किटक आणि अळ्यांच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण कसे करावे अशा विविध प्रश्नांची उत्तरे दिली जातात.

जर कोणी गुरुवारी हा कार्यक्रम ऐकू शकले नाही तरी या कार्यक्रमाची अद्यावत माहिती ०११६६०३२८८० या टोल फ्री क्रमांकावर मिळवू शकते.