श्री श्री रविशंकर :
जागे व्हा आणि लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीचा एक दिवशी अंत होणार आहे.आजपर्यंत,या क्षणापर्यंत निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व संपणार आहे.सुखकारक असो की दु:खकारक,चांगले असो की वाईट,आतापर्यंत जे काही झाले आहे आत्ता अस्तित्वात नाही,संपलेले आहे.जसे आपण जीवनात पुढे जात असतो तसे आपल्या लक्षात येते की प्रत्येक गोष्टीला अंत आहे.काहीच राहणार नाहिये.तरीही आपण बसून त्यावर विचार करत राहतो.याची-त्याची काळजी करत राहतो.सगळे झटकून टाका,जागे व्हा आणि बघा- काहीच नाहिये.सगळे शून्य आहे - याची.याची नुसती जाणीव होण्यानेच तुमच्यात शहाणपणा येऊ लागतो.जे काहीच उरलेले नाही तेच खरे तर सगळे काही आहे.याची तुम्हाला सतत स्वत:ला आठवण करून देत रहायला हवी म्हणजे ते तुमच्या स्मृतीत कोरले जाईल.तुमचा भूतकाळ मागे टाकून तुम्ही कसे पुढे जात आहात बघा. ‘सगळे काही शून्य, फोल आहे’, हे गौतम बुद्धाने सांगितलेले हृदय सूत्र आहे. यालाच आदि शंकराचार्यांनी 'अद्वैत तत्वज्ञान' म्हटले आहे. पंचमहाभूते ही शून्य आहेत. मी काहीही नाही. तुम्ही काहीही नाही. भक्त हीच गोष्ट वेगळ्या प्रकाराने सांगतात. ते म्हणतात, “ मी अकिंचन आहे”.हे एकदा तुमहाला समजले की तुमच्यात विशाल जाणीव निर्माण होते.जेंव्हा तुम्ही अतिशय चिंतेत असता तेंव्हा स्वत:ला जागवा. स्वत:ला आठवण करून द्या की एक दिवस आपल्या सगळ्यांनाच मरायचे आहे. तुम्ही तुमच्या शरीराला कितीही नटवले तरी एक दिवस ते चितेवर जळून जाणार आहे. प्रत्येक समस्येकडे एक आव्हान म्हणून बघा. आव्हान म्हणून स्वीकारा आणि मग बघा. मग जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य घालवू शकेल. हे समजण्यासाठी किती पुस्तके वाचाल ? काय कराल, कुठे जाल ? तुम्ही काहीच करायची गरज नाही. ‘मी काय करू” असे विचारून-विचारून लोक थकून गेले आहेत. आणि ‘हे करा, ते करा, हे करा’ असे सांगून गुरु थकून गेलेत. तर तुम्ही काहीही करायला नको. फक्त इतके लक्षात ठेवा की, हे सगळे शून्य, फोल आहे.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri