जाणून घेऊया राम नवमी आणि रामायणचे गूढ ज्ञान | Knowledge behindi Ram Navami and Ramayana

राम शब्दाचा अर्थ काय आहे ?​ | Meaning of word RAM

राम चा अर्थ आहे स्वयंप्रकाश,अंतःप्रकाश,स्वतःच्या आतील प्रकाश.’रवि’ चा अर्थ देखील तोच आहे. र म्हणजे प्रकाश, वि म्हणजे विशेष.याचा अर्थ आहे आपल्या आतील शाश्वत प्रकाश!म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम.

रामनवमी आणि राम जन्माचे गूढ ज्ञान |Knowledge behind Ram navami and Ram janm

’राम नवमी’ आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटीप्रित्यर्थ साजरी केली जाते.भगवान रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी झाला होता.

कौसल्या म्हणजे कौशल्य आणि दशरथ चा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत.आपल्या शरीराला दहा अंग आहेत,पंच ज्ञानेंद्रिय आणि (दोन हात,दोन पाय,जननेन्द्रिय(उत्सर्जन इंद्रिये) आणि तोंड अशी) पंच कर्मेंद्रिये.

सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्रीभाव ठेवते.कैकयी म्हणजे जी सदैव सर्वाना निस्वार्थपणे देत रहाते.

अश्यातऱ्हेने राजा दशरथ आणि त्याच्या या तिन्ही राण्या एका ऋषीकडे गेल्या.त्या ऋषीने त्यांना दिलेल्या प्रसादामुळे आणि देवाच्या कृपेने भगवान रामांचा जन्म झाला.

राम म्हणजे अंतःप्रकाश, लक्ष्मण ( भगवान रामाचा लहान भाऊ ) म्हणजे सजगता.शत्रुघ्न म्हणजे अजातशत्रू आणि ज्याला कसलाही विरोध नाही.भरत म्हणजे योग्य,प्रतिभावान.

अयोध्या (येथे भगवान रामाचा जन्म झाला) म्हणजे असे स्थळ जे केंव्हाहि नष्ट होऊ शकणार नाही.

रामायणाचे सार​| Summery of Ramayana

या कथेचा मतितार्थ हा आहे, अयोध्या म्हणजे आपला देह.कार्यरत पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचा  राजा आहे.कौशल्य याची राणी आहे.आपली इंद्रिये बहिर्मुख असतात, कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते.आणि जेंव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजेच भगवान राम आपल्यात प्रकट होतात तेंव्हाच शक्य होते.

हिंदू पंचांगानुसार भगवान रामांचा जन्म नवमी दिवशी झाला आहे,त्याचेही महत्व आहे जे मी पुन्हा कधीतरी सांगेन.

जेंव्हा आपल्या मन(सीता)चे अहंकार(रावण) द्वारा अपहरण होते,तेंव्हा आत्म प्रकाश आणि सजगता(लक्ष्मण) यांच्या माध्यमातून भगवानांनी हनुमान(प्राण शक्तीचे प्रतिक)च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते.हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते.


राम नवमीचे महत्व​| significance of Ram Navami

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

- गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान चर्चेमधून