१६ मार्च २०१३
दिल्ली, भारत
ज्ञान हे कालातीत आहे!
सूर्य हा प्राचीन आहे, पण सूर्याचे किरण आजसुद्धा ताजेतवाने आहेत. ते जुने अथवा शिळे किरण नाहीयेत. तसेच पाण्याचेसुद्धा आहे. गंगा नदी ही इतकी प्राचीन आहे, पण आजसुद्धा तिचे पाणी तितकेच निर्मळ आहे.
त्याचप्रमाणे, मी तर म्हणेन की आपल्या आयुष्याला लागू होणारे ज्ञान जे प्राचीन असूनसुद्धा नीतनवीन आणि ताजेतवाने आहे. जे जीवनाचा पुरस्कार करते ते ज्ञान होय.
ज्ञानी कोण आहे
अडाणी, किंवा कट्टर धार्मिक यांना पहा; स्वतःला बुद्धीजीवी म्हणणारे यांच्यात नास्तिकवादीची फँशन असते, आणि ज्यांना प्राचीन आणि आधुनिक यांची सांगड घालून स्वतःचे जीवन घडवता येते ते ज्ञानी असतात.
ज्याप्रमाणे एका वृक्षाला जुन्या मुळांची आणि नवीन अंकुरित झालेल्या कोंबाची आवश्यकता असते; त्याचप्रमाणे जीवन हे बदलाभीमुख असले पाहिजे, आणि हेच प्राचीन ज्ञान आहे.
ऋग्वेदातील सर्वात पहिला श्लोक आहे -
"अग्निः पूर्वेर्भी ॠषीर्भी ईदयो नूतनैर उता "
जुने आणि नवीन, हे दोहो एकत्रित अस्तित्वात असतात, आणि हेच ज्ञान आहे.
तंत्रज्ञान आणि व्यापार यांच्याप्रमाणेच, परंपरांचे पुनरुज्जीवन आणि पुनरावलोकन पुन्हा करणे जरुरी आहे. हे महत्वाचे आहे. आणि भारताचे चैतन्य असे आहे की आपण हे करू शकलो होतो. प्राचीन काळापासून परंपरेचे काही आयाम आपण कायम ठेवले, तरीसुद्धा आधुनिक काळाच्या गरजेनुसार आणि जीवनाच्या आव्हानानुसार परंपरा या अतिशय अनुकूलक्षम बनलेल्या आहेत.
ज्ञान म्हणजे खरोखर काय? आपण ज्ञानी का असायला पाहिजे?
कोणालाही यातना नको असतात. कोणालाही निराशा नको असते. ज्याच्यामुळे दुःख दूर होते, जे दूरदृष्टी देते, ज्याच्यामुळे जीवन चैतन्यमय होऊन जाते, आणि जे वैयक्तिक स्वयंला विश्वामध्ये उपस्थित असलेल्या वैश्विक स्वयं सोबत जोडते, ते ज्ञान होय.
ज्ञान हे अपरिमित समाधान देते. असे समाधान जे छोट्या तृप्ततेमधून मिळू शकत नाही. आणि असे अपरिमित समाधान हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की याचा शिक्षणाबरोबर काहीही संबंध नाहीये. गावागावातून अशिक्षित लोकांमध्ये तुम्हाला ज्ञानी माणसे सापडतील. कदाचित जास्तच. त्यांना परिवाराचे व्यवस्थापन कसे करायचे माहिती असते, त्यांना त्यांच्या विभागात शांतात कशी ठेवायची ते माहिती असते, त्यांना माणसे कशी जोडायची हे माहिती असते, आणि त्यांना जीवन एक उत्सव कसा करायचे हे माहित असते. जीवनाचे उत्सवात रुपांतर होणे,ज्यामुळे चेहऱ्यावर हास्य फुलून येते हेच ज्ञान आहे. ते जे तुम्हाला निरोगी ठेवते, आणि तुमच्या जीवनात पुढे पाहण्याची आंतरिक दृष्टी देते ते ज्ञान होय.
विचारावर आपण चर्चा करीत असताना मला अजून एक मुद्दा जोडावा असे वाटते. मला वाटते की विचार हा केवळ घराच्या दारावरचा रखवालदार आहे. भावना या विचारापेक्षा थोड्या बलवान असतात. तुम्ही असा विचार करीत असाल ,’मी आनंदात आहे’, किंवा तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न त्या विचाराच्या दिशेने ठेवाल, परंतु जेव्हा भावना उत्पन्न होतात मग सगळे संपले, भावना अतिशय वेगाने चाल करून येतात की तुम्ही स्वतःकडे ठेवलेल्या संपूर्ण विचार प्रक्रिया क्षणार्धात नाहीशा होऊन जातात.
तुमच्या विचारांपेक्षा तुमच्या भावना फार शक्तिशाली आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही असे जरी म्हणत असाल, ‘मला आनंदित राहायचे आहे’, किंवा ‘मी आनंदात आहे’, परंतु जेव्हा वैफल्यग्रस्त प्रसंग उत्भवतात तेव्हा अचानक मोठा भावनावेग उसळतो किंवा प्रचंड उर्जा निर्माण होते आणि मग हे सगळे विचार गायब होऊन जातात.
म्हणून आपल्याला जीवनाच्या अनेक पातळ्यांवर काम करणे जरुरी आहे. सर्वप्रथम वातावरण, नंतर देह, श्वास, श्वास हा मन आणि देह यांना जोडणारी कडी आहे. नंतर मन; विचार. मग भावना, ज्या तरल आहेत आणि मनापेक्षा शक्तिशाली आहेत. आणि या सर्वांच्या पलीकडे, उर्जा क्षेत्र, जे सकारात्मक आहे, तेजस्वी आहे, आत्मा किंवा चैतन्य जे तुम्ही आहात ते फुलून येते.
आणि ध्यानाचे हे सर्व तंत्र, क्रिश्चन परंपरेतील चिंतनशील प्रार्थना, किंवा बौद्ध झेन ध्यान पद्धती, हे सर्व वैचारिक पातळी पार करतात आणि अशा पातळीवर पोचतात जिथून सर्व काही नियंत्रित केले जाते. आणि हे म्हणजे घराच्या मालकाची प्रत्यक्ष भेट घेणे होय. एकदा का घरच्या मालकाची प्रत्यक्ष भेट झाली की मग रखवालदार मालकाचे म्हणणे ऐकेल.