परिपूर्णता हा साक्षात्कारी व्यक्तीचा स्वभाव आहे (Nature of the enlightened ones in Marathi)

अज्ञानाच्या अवस्थेमध्ये अपूर्णता ही नैसर्गिक आहे आणि परिपूर्णतेकरीता प्रयत्न करावे लागतात.ज्ञानाच्या किंवा साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये अपूर्णत्वाकरिता प्रयत्न करावे लागतात तर परिपूर्णता ही अनिवार्य आणि अटळ असते.परिपूर्णता म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेणे आणि संपूर्ण जबाबदारी याचा अर्थ हा की तुम्ही एकटेच आहात जे या संपूर्ण जगताकरिता जबाबदार आहात.जेंव्हा तुम्ही विचार करता की इतर कोणी जबाबदार आहे तेव्हा तुमच्या जबाबदारीचा अंश कमी होतो.

जेव्हा तुम्ही संपूर्ण वैराग्याचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही क्षुल्लक आणि सर्वसाधारण गोष्टींचा सामना अतिशय परिपूर्णतेने करू शकता.उदाहरणार्थ दररोज सकाळी पूजा करताना आपण करीत असलेली सजावट दहा मिनिटेसुद्धा टिकणार नाही हे माहीत असूनदेखील गुरुजी पूजेचे टेबल निरनिराळ्या रंगांचे संयोजन वापरून नक्षीदार रचना करून इतके सुंदर प्रकारे सजवतात.पूजा संपल्यानंतर ते स्वतः ते हार-फुले काढतात किंवा लोकांवर त्यांचा वर्षाव करतात.गहन समाधीवस्थेत असतानासुद्धा ते अतिशय सहजपणे आणि प्रेमाने दररोज पूजेचे टेबल सजवतात.अर्थात फुले कशी ठेवली आहेत याने काहीही फरक पडत नाही तरीसुद्धा इतक्या कुशाग्र जागरूकतेने एवढ्या क्षुल्लक गोष्टींवर लक्ष राहणे हे केवळ संपूर्ण वैराग्यामुळेच शक्य आहे.

परिपूर्णता हा साक्षात्कारी व्यक्तीचा स्वभाव आहे.

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी झालेला ' जागतिक सांस्कृतिक उत्सव ' (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय.हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडून  आले.

www.artofliving.org/wcf