गुपितांमागील ज्ञान (Wisdom of secrets in Marathi)

एक ज्ञानी व्यक्ती गुपित लपवण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही तसेच ते उघड करण्याचाही प्रयत्न करत नाही. उदाहरणार्थ, आपण एका ५ वर्षांच्या मुलाशी स्त्रियांची मासिक पाळी, मृत्यू ह्या विषयांवर बोलत नाही.पण जसजसे त्याचे वय वाढते तसतसे त्याच्यापासून या गोष्टी लपवताही येत नाहीत.त्या आपसूकच त्यांना कळू लागतात.

एक अज्ञानी व्यक्ती गुपित लपवण्याचा प्रयत्न करतो आणि चुकीच्या वेळी,चुकीच्या व्यक्तीकडे आणि चुकीच्या जागी उघड करतो आणि गोंधळ निर्माण करतो.गुपित लपवण्याच्या प्रयत्नात अस्वस्थता व अनिश्चितता निर्माण होते.अज्ञानी व्यक्ती गुपित लपवून किंवा उघड करूनही स्वस्थ राहू शकत नाही परंतु ज्ञानी व्यक्ती दोन्ही परिस्थितीत स्थिर,स्वस्थ असतो.

 

 

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी झालेला ' जागतिक सांस्कृतिक उत्सव ' (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा,माणुसकी,अध्यात्म आणि मानवी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय.हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणले.

www.artofliving.org/wcf