आत्मनिर्भरता आणि शरण जाणे (Self reliance and surrender in Marathi)

डिसेंबर २५, १९९६ नाताळचा दिवस

लेक लुसर्न, स्वित्झर्लंड

आत्मनिर्भर असण्यासाठी खूप हिंमत लागते. जेंव्हा कोणाचीही साथ नसते किंवा प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला स्वतःवरच अवलंबून राहणे पसंत असते तेव्हा तुमच्याकडे भरपूर हिंमत असावी लागते.

शरण जाणं थोडं सोपं असते.

जी व्यक्ती शरण जाऊ शकत नाही ती आत्मनिर्भरसुद्धा होऊ शकत नाही.
जर तुमच्याकडे शरण जाण्याची हिंमत नसेल तर मग आत्मनिर्भर होणे शक्य नाही.तुम्ही केवळ स्वतःचे समाधान करीत आहात. जर तुमच्याकडे शंभर रुपये नसतील मग तुमच्याकडे हजार रुपये असू शकत नाहीत. थोडीशीसुद्धा भीती ही आत्मनिर्भरतेकरिता घातक आहे.

आत्मनिर्भरतेमध्ये शरण असणे हे समाविष्ठ असते. पन्नास डॉलरमध्ये दहा डॉलर समाविष्ठ असतात.

बहुधा लोक विचार करतात की शरण जाणे हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळ काढण्याचा एक मार्ग आहे. आणि मग सरतेशेवटी ते त्यांच्या सगळ्या समस्यांकरिता देवाला दोष देतात. वास्तविकपणे सगळ्याची संपूर्ण जबाबदारी घेणे म्हणजेच खरे शरण जाणे होय.

सुझॅना: आम्ही ते कसे काय करू शकतो?

श्री श्री: तुम्ही जबाबदारी घ्या आणि मदतीकरिता प्रार्थना करा.

शरणागत होण्याने अखेरीस तुम्ही आत्मनिर्भर होता कारण आत्म्या शिवाय काहीही नाही.

श्री श्री यांचा नाताळचा संदेश:

" प्रेमाचे कारंजे व्हा !"