सर्व इच्छा या आनंद मिळवण्यासाठी आहेत. सगळ्या इच्छांचा हाच हेतू आहे. पण किती वेळेला इच्छा तुम्हाला उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतात? तुमच्या इच्छांबाबत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? मनात इच्छा (तृष्णा) असणे म्हणजे भूतकाळात आनंदाचा शोध घेणे, ह्या क्षणात नाही. बरोबर? आनंद सुख हे कधीही भूतकाळात नसते. ते आत्ता, या क्षणात असते..
जर तुम्ही सुखी आणि आनंदी असाल तर तुम्हाला इच्छा कशा असतील? आणि जर आता तुम्हाला इच्छा असतील तर तुम्ही आनंदी कसे असाल? इच्छापूर्ती झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल हा एक भ्रम आहे. म्हणूनच त्याला माया असे म्हणतात. तुम्हाला काय वाटते?