ज्याने सर्व काही दिले आहे त्याने स्वातंत्र्य ही दिले आहे. ह्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि जे काही दिले आहे त्याचा सदुपयोग करावा.
तुमचे संकल्प आणि इच्छा तुम्हाला ईश्वरापासून अलिप्त ठेवतात.
तुमचे सगळे संकल्प व वासना ईश्वरचरणी समर्पित करून टाका. मग तुम्हालाच दैवत्व प्राप्त होते. मग तुम्ही मुक्त व्हाल, कशाचीही कमी राहणार नाही.
भौतिक / सापेक्ष जगाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात पण परमेश्वर / निरपेक्षाची प्राप्ती अनासायासपणे होते. हे एक गुपित आहे.
तुमचे मन खरंतर तुमचे नसतेच, त्याला दोष देऊ नका.
त्याला आत्म्यात विलीन होऊ द्या.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.