सत्य जाणण्याची इच्छा (Desire for truth in Marathi)

बुद्ध म्हणाले की इच्छा ही सर्व दुःखांचे कारण आहे. जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याने नैराश्य येते आणि नैराश्यामुळे दुर्दशा प्राप्त होते. आणि समजा इच्छा जरी पूर्ण झाली तरी त्याने तुम्हाला रिकामे वाटते.

ऋषी वसिष्ठ म्हणतात, की इच्छा ही संतोषाचे कारण आहे. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू किंवा व्यक्तीची इच्छा करता तेव्हाच तुम्हाला त्यापासून आनंद मिळतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा करीत नाही तेव्हा तुम्हाला त्यापासून आनंद मिळत नाही. उदाहरणार्थ जर एका माणसाला उकडते आहे आणि तो तहानलेला आहे तर त्याला थंड पाण्याच्या एका घोटाने संतोष मिळतो. पण जर तो तहानलेला नसेल तर नाही. जे काही तुम्हाला सुख प्रदान करते ते तुम्हाला बांधून ठेवते आणि बंधनात दुःख असते.

श्री श्री म्हणतात जेव्हा तुम्ही सत्याची इच्छा करता तेव्हा बाकीच्या सर्व इच्छा गळून जातात. तुम्ही नेहमी अशा काही गोष्टींची इच्छा करता जी हजर नाही. परंतु सत्य तर कायम असते. सत्याची इच्छा बाकीच्या सगळ्या इच्छांना काढून टाकते आणि ती स्वतःसुद्धा विरघळून जाते. आणि बाकी राहतो तो केवळ परमानंद.