नियमबद्ध योगाभ्यासाच्या सरावामुळे शरीरातील आजारपणा आणि दैनंदिन ताण-तणाव कमी होतात. परिणामी आपले शरीर सर्वांगीण रितीने निरोगी, उत्साही बनते.
योग्य प्रशिक्षण आणि नियमित सरावाने केलेल्या योगसाधनेचा लाभ सर्वांनाच होतो.
योगाच्या दैनंदिन सरावामुळे शरीराला मिळणारे लाभ:
- पचनशक्ती, रक्तसंचार आणि रोगप्रतिकार शक्तीमध्ये वृद्धी.
- मज्जासंस्था आणि अंतस्त्राव ग्रंथीची कार्यक्षमता वृद्धिंगत होते.
- खालील आजारांपासून मुक्ती मिळणे आणि त्यांना रोखणे शक्य होते.
- उच्च रक्त दाब,
- शारीरिक वेदना,
- चिंता आणि भीती पासून मुक्ती,
- नैराश्य.
- निद्रानाश,
- सततचा थकवा.
श्री श्री योगा मध्ये आसनांवर आणि श्वसन प्रक्रियांवर सर्वांगीण कार्य केले जाते. खालील योगासने आणि प्राणायाम यांचा उच्च रक्तदाब कमी करणेसाठी उपयोग होतो. मात्र सराव करण्यापूर्वी त्यांचे योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
- सुखासन
- पूर्ण योगिक श्वसन
- भ्रामरी
- जनुशीर्षासन
- पश्चिमोत्तासन
- पुर्वातानुसन
- शवासन
- अर्ध हलासन
- सेतु बंधासन
- पवनमुक्तासन मधील बदल ( डोके वर न उचलता गुडघे वर्तुळाकार फिरवणे.
- पोटावर झोपणे.
- मकरासनामध्ये भ्रामरी
- शिशुआसन
- वज्रासन
- सुप्तवज्रासन
- पाय पसरून शवासनात झोपणे
- योगनिद्रा.
रक्तदाबासाठी उपयुक्त आसनांचे वर्णन
शवासनामध्ये विश्राम:
- तुम्ही अंतिम स्थितीतील विश्रांतीसाठी स्वेटर, पायमोजे तसेच पांघरून वापरू शकता.
- पाठीवर झोपा.
- श्वास घेत डोक्यापासून पायापर्यंत शरीर ताठ करा. श्वास रोखा. मुठी घट्ट आवळा, चेहऱ्याचे सर्व स्नायू तसेच शरीरातील प्रत्येक स्नायू घट्ट आवळा.
- ‘ हा ’ आवाज करत श्वास सोडत सर्व स्नायू शिथिल सोडा.
- परत एकदा हीच कृती करा.
- आरामशीर स्थितीमध्ये पडून रहा. डोळे बंद ठेवा.
- शरीरातील प्रत्येक अवयवाकडे लक्ष नेत विश्राम करा. पायापासून डोक्यापर्यंत या क्रमाने करु या. प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञ राहू या. कृतज्ञतेमुळे आणखी शारीरिक आणि मानसिक विश्राम प्राप्त होतो.
- जे काही आपले वजन आहे, जमिनीवर टाकू या. शरीर अत्यंत हलके होईल. आरामदायी शरीर आणखी हलके होते.
- श्वासाप्रती सजग होत त्याला हलके, छोटे आणि शांत करत विश्रांती देऊ या.
- मनातील सगळ्या चिंता, भिती, काळजी तसेच उत्तेजितपणा सोडून देऊ या. हे सगळे ईश्वराला समर्पित करू या. काही काळासाठी भविष्यातील योजना आणि भूतकाळातील प्रसंग सोडून देऊ या.
- तुमच्यामधील शांत आणि आनंदी स्वभावामध्ये विश्राम करू या.
- काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर शरीराप्रती सजग होत एक-दोन दिर्घ श्वास घ्या.
- आपल्या उजव्या कुशीवर वळून झोपा.
- हळूवारपणे उठून बसा.
- तीनवेळा ॐ चा उच्चार करा.
शिशुआसन:
- टाचांच्यावर बसा. दोन्ही टाचांच्यामध्ये बैठक ठेवा.(वज्रासन). पुढे झुका आणि कपाळ जमिनीवर टेकवा.
- दोन्ही हात शरीराशेजारी, तळवे आकाशाकडे करून ठेवा.( जर हे शक्य नसेल तर हाताच्या मुठी एकमेकावर ठेऊन कपाळ त्यांच्यावर टेका).
- छाती हळुवारपणे मांड्यांवर दाबा.
- स्थिर रहा.
- हळुवारपणे प्रत्येक मणक्या गणिक वर येत टाचांवर बसा, आणि विश्राम करा.
फायदे :
- पाठीला पूर्ण विश्राम मिळतो.
बद्धकोष्ठता नाहीशी होते.
मज्जा संस्थेला विश्राम मिळतो.