दिब्रुगढ, आसाम : दिब्रुगढ जिल्ह्यातील खोक्लू पठार, टिंगखोंग येथे युवाचार्या ममोनी दत्ता यांनी २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण हप्पिनेस प्रोग्रॅम आयोजित केला होता. आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक सुभा करण गोहाई यांनी हे शिबीर यशस्वीपणे संपन्न होणेसाठी मदत केली. याचा लाभ सतरा लोकांना झाला. २७ ऑक्टोबर रोजी, सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ ला अनुसरून स्वच्छता सेवा करून हे शिबीर संपन्न झाले.
हे स्वच्छता अभियान टिंखोंग आधार्को विद्यालय, या सरकारी शाळेत झाले. जवळपास १५० विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यामध्ये सहभागी झाले. ‘प्रत्येकाने या अभियानामध्ये मोठ्या उत्साहात आणि निस्पृहपणे सेवा केली’,असे ममोनी दत्ता म्हणाल्या, गावातील मुलांच्यासाठी मोफत शिबीर होणार आहे.